शिक्षणाचा उपयोग उद्योगात व्हावा : शरयू देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 01:00 AM2018-12-18T01:00:51+5:302018-12-18T01:01:05+5:30
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के. माहिला महाविद्यालयात आयोजित सृजन या शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन शरयू देशमुख यांच्या हस्ते झाले. देशमुख पुढे म्हणाल्या की, शिक्षणाचा उपयोग करून स्वत:चे उद्योगविश्व तयार करा. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सशक्त माध्यम आहे व आपल्या शिक्षणाचा समाजासाठी अधिकाधिक उपयोग करा, असे आवाहन त्यांनी केले.
नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के. माहिला महाविद्यालयात आयोजित सृजन या शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन शरयू देशमुख यांच्या हस्ते झाले. देशमुख पुढे म्हणाल्या की, शिक्षणाचा उपयोग करून स्वत:चे उद्योगविश्व तयार करा. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सशक्त माध्यम आहे व आपल्या शिक्षणाचा समाजासाठी अधिकाधिक उपयोग करा, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्य दीप्ती देशपांडे, उपप्राचार्य साधना देशमुख, डॉ. कविता पाटील, डॉ.नीलम बोकील व्यासपीठावर उपस्थित होत्या. या प्रदर्शनात महाविद्यालयाच्या प्रत्येक विभागाने विविध प्रतिकृती, तक्ते, भित्तीपत्रे ठेवली आहेत. मराठी विभागाने पुस्तकांचे गाव साकारले आहे. हिंदी विभागाने हिंदी साहित्यकृतींचा परिचय करून दिला आहे. गृहविज्ञान शाखेने वस्त्रप्रावरण कला, तसेच आहारशास्त्र विषयाद्वारे आहाराच्या बदलत्या संकल्पना, महिला आहारतज्ज्ञांचे योगदान स्पष्ट केले आहे. संगीत विभागाद्वारे माहिला गायिकांची शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील कामगिरी ध्वनिमुद्रणाच्या माध्यमातून दाखविली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी खुले आहे, असे प्राचार्यांनी सांगितले.