आदिवासी भागात आॅडिओ डिव्हाईसद्वारे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 09:46 PM2020-07-20T21:46:09+5:302020-07-21T02:02:36+5:30
पेठ : कोरोना काळात बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये आॅनलाईन शिक्षण देण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आता आॅफलाईन आॅडीओ डिव्हाईसचा वापर करण्यास सुरु वात झाली असून पेठ तालुक्यातील २० माध्यमिक शाळांच्या जवळपास बाराशेच्या वर दहावीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

पेठ पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्या संकल्पनेतून तसेच माजी पोलीस अधिकारी वैशाली शिंदे- शेंडे
यांच्या मदतीतून दहावीच्या मुलांच्या अध्ययन अध्यापनात अडचणी
निर्माण होऊ नये यासाठी आॅडीओ डिव्हाईस तयार करण्यात आले असून प्रभारी उपसंचालक प्रविण पाटील यांच्या उपस्थितीत पेठ तालुक्यातील २० माध्यमिक शाळांकडे हे उपयुक्त डिव्हाईस हस्तांतरीत करण्यात
आले. याप्रसंगी सरोज जगताप, वैशाली शिंदे- शेंडे, विपश्यना निदेशक नम्रता पारख, विस्तार अधिकारी वसंत खैरनार, प्रशांत जाधव, धनश्री कुंवर, भारती कळंबे, सुनिता जाधव, गोपीचंद भामरे,करूणा वाडेकर यांच्यासह माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
--------------------
काय आहे
आॅडीओ डिव्हाईस?
दुर्गम भागात पालकांकडे अॅड्राईड मोबाईल व इंटरनेटच्या अनेक अडचणी असल्पाने आॅनलाईन अध्ययन अध्यापन करणे अवघड असल्याने याला पर्याय म्हणून आॅडीओ डिव्हाईस ची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये तज्ञ शिक्षकांचे नमूना पाठ ध्वनीमुद्रित करण्यात आले असून त्यांचे विषय व पाठनिहाय विभाग करण्यात आले आहेत. इंटरनेट व वीजे शिवाय याचा वापर करण्यात येणार असल्याने वाडी वस्तीवरील विद्यार्थी याद्वारे शिक्षण घेऊ शकणार आहेत.