शैक्षणिक दाखले, सातबारा उताऱ्यांनाही विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 11:50 PM2019-06-25T23:50:00+5:302019-06-26T00:24:41+5:30

शेतकरी वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आॅनलाइन सेवेतील गोंधळ वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासाठी लागणाºया दाखल्यांना विलंब होत आहे, तर सातबारा उतारा संगणकीकरण करण्याच्या कामातही दिरंगाई होत असल्याने सर्वांचीच कामे अडकून पडली आहेत.

 Educational certificates, Seven lifts and delay | शैक्षणिक दाखले, सातबारा उताऱ्यांनाही विलंब

शैक्षणिक दाखले, सातबारा उताऱ्यांनाही विलंब

googlenewsNext

नाशिक : शेतकरी वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आॅनलाइन सेवेतील गोंधळ वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासाठी लागणाºया दाखल्यांना विलंब होत आहे, तर सातबारा उतारा संगणकीकरण करण्याच्या कामातही दिरंगाई होत असल्याने सर्वांचीच कामे अडकून पडली आहेत. सर्व्हरवर आलेल्या ताणामुळे संपूर्ण यंत्रणेत व्यत्यय येत असल्यामुळे दाखले आणि उतारे मिळण्यास मोठी अडचण निर्माण झालेली आहे. याप्रकरणी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सातबारा उताºयाची कामे कर्मचाºयांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सातबारा उतारे संगणकीकरण करण्याचे काम सध्या सुरू असून सदरील आॅनलाइनच्या नावाने तलाठी सातबारा उताºयांवरील नोंदी करणे तसेच नवीन सातबारा उतारा तयार करण्याच्या कामांना विलंब करीत असल्याचे राष्टÑवादीने निवेदनात म्हटले आहे. या विलंबामुळे शेतकºयांच्या जमिनीच्या व्यवहारावरदेखील परिणाम होत आहे. शेतकºयांना दैनंदिन कामासाठी लागणारे सातबारा उतारे उपलब्धच होत नसल्यामुळे आॅनलाइन सातबारा उताºयाचे काम सुरू असेपर्यंत नवीन सातबारा उतारे तयार करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शासनाकडून वितरित करण्यात येणारे शालेय उपयोगी दाखले, शेतजमिनीच्या कामासाठी लागणारे सातबारा उतारे, रेशनकार्ड आदी सेवा आॅनलाइन पद्धतीने पुरविल्या जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाल्यामुळे आॅनलाइन कागदपत्रे मिळविण्यासाठी मोठी अडचण निर्माण झालेली आहे. सर्व्हर डाउनमुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प होण्याचा प्रकार बंद होत नाही तोच लिंक ओपन न होण्याचा प्रकार सुरू झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सातत्याने महाआॅनलाइन केंद्रात चकरा माराव्या लागत आहेत. दाखले तयार होण्याची प्रक्रियाच थंडावल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाचा
प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप राष्टÑवादीकडून करण्यात आला आहे.
संपूर्ण विस्कळीत झालेली यंत्रणा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा राष्टÑवादीचे अ‍ॅड. सुरेश आव्हाड, प्रकाश माळोदे, नसीर पठाण, शेख मोहिय्योद्दिन हाजी शेख, विकी भुजबळ, प्रमोद मंडलिक, राजेश पांडे, अ‍ॅड. संदीप दंडगव्हाण, राजेश जाधव, रेखा शेलार, सुरेखा पाठक, भारती चित्ते यांनी दिला आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दाखले तयार झाले असले तरी त्यावर अधिकाºयांच्या डिजिटल स्वाक्षरी होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दाखल्यांना विलंब होत आहे. विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलिअर आदी दाखले अडकून पडले आहेत.

Web Title:  Educational certificates, Seven lifts and delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.