सोनोशी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:35 IST2021-01-28T20:27:49+5:302021-01-29T00:35:00+5:30

सर्वतिर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत सोनोशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना सोनोशी येथील बाडगी क्रिकेट संघाकडून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

Educational materials for students at Sonoshi | सोनोशी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

सोनोशी येथील जि प शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतांना बाडगी क्रिकेट संघाचे सर्व सदस्य पदाधिकारी.

ठळक मुद्देशाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना कंपास व शालेय साहित्य वाटप

सर्वतिर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत सोनोशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना सोनोशी येथील बाडगी क्रिकेट संघाकडून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जवळपास दहा महिने कडक संचारबंदी होती. देशात व राज्यात सर्व शाळा बंद होत्या या संचारबंदी कालावधीत शालेय विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले, परंतु नुकतीच शाळा चालू करण्याचे शासनाने आदेश काढल्याने व बुधवारी (दि.२७) शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना कंपास व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी सरपंच दिलीप पोटकुले, माजी सरपंच सीताराम खोंडे, सुदाम पेढेकर, माधव घाणे, गणपत धोंगडे, योगेश धोंगडे, गोकुळ मेडगे, दिनेश पेढेकर, बाडगी क्रिकेट संघाचे सर्व सदस्य, पदाधिकारी वर्ग उपस्थित होते.

 

Web Title: Educational materials for students at Sonoshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.