जीवनात शिक्षणाचे नाते महत्त्वाचे : समशेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:22 AM2018-04-14T00:22:33+5:302018-04-14T00:22:33+5:30
भविष्यात शिक्षण हेच एक साधन आहे की तेच आपल्याला शिक्षित करू शकते, हे लक्षात घेऊन महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे आता जातीच्या नात्यापेक्षा शिक्षणाचे नाते महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन व्याख्याते प्रकाश समशेर यांनी केले.
नाशिकरोड : भविष्यात शिक्षण हेच एक साधन आहे की तेच आपल्याला शिक्षित करू शकते, हे लक्षात घेऊन महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे आता जातीच्या नात्यापेक्षा शिक्षणाचे नाते महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन व्याख्याते प्रकाश समशेर यांनी केले. आर्टिलरी सेंटररोड जैन मंदिरासमोरील मनपा मैदानावर महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले कला, क्रीडामंडळाच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आला होते. यावेळी बोलताना व्याख्याते प्रकाश समशेर म्हणाले की, प्रथम पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन समाजातील महिलांना शिक्षित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलांना शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली, असे समशेर यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी नाशिकरोड-देवळाली बॅँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर प्रथमेश गिते, जैन संघपती डॉ. राजेंद्रकुमार मंडलेचा, डॉ. किशोर देवळालकर, विजय शंकर देसाई, महेशकुमार ढकोलिया, विजय मनोहर देसाई, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, जयश्री खर्जुल, आशा तडवी, सुषमा पगारे, सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, बाजीराव भागवत, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, संजय गायकवाड, सुनील आडके, संतू पाटील, जयंत गाडेकर आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष संतोष गाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन सुधाकर जाधव व आभार योगेश गाडेकर यांनी मानले. यावेळी प्रमोद लोणकर, आदेश जाधव, विशाल गाडेकर, अविनाश गाडेकर, संतोष मंडलिक, मिलिंद थोरात, प्रशांत जेजूरकर, लंकेश गाडेकर, रवींद्र रासकर, पोपट गिते, आदर्श गाडेकर, राजेंद्र सोमवंशी आदी उपस्थित होते.
आगरटाकळी येथे अभिवादन
उपनगरला क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा सखोल अभ्यास स्पर्धा परीक्षेचा सराव करताना करता आला. त्यामुळे विचारानुसार कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रतिपादन पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. आगरटाकळी येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोकाटे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर अशोक दिवे, प्रभाग सभापती शाहीन मिर्जा, नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, दिनकर आढाव, आशा तडवी, सुषमा पगारे, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते आदी मान्यवर उपस्थित होते