द्राक्ष निर्यातीवर थंडीचा परिणाम अत्यल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:17 PM2017-12-02T13:17:18+5:302017-12-02T13:21:05+5:30

The effect of cold weather on grape exports is minimal | द्राक्ष निर्यातीवर थंडीचा परिणाम अत्यल्प

द्राक्ष निर्यातीवर थंडीचा परिणाम अत्यल्प

Next
ठळक मुद्दे७० कंटेनर निर्यातहंगामात सहा हजार कंटेनरच्या निर्यातीची अपेक्षारशिया, मलेशिया निर्यात सुरू

नाशिक : जिल्ह्यात दीड लाख एकरावरील द्राक्ष बागा असून, कडाक्याच्या थंडीचा निर्यातक्षम द्राक्षबागांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आतापर्यंत बागलाणसह नजिकच्या परिसरातून रशिया, मलेशिया, हॉँगकॉँग येथे ७० ते ८० कंटेनरची निर्यात झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मागील आठ दिवसात रशियात १५ कंटनेर द्राक्षांची निर्यात झाल्याचे समजते.
जिल्हयात सप्टेंबर आणि आॅक्टोबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा संकटात सापडल्याचे चित्र होते. मात्र नंतर हवामान चांगल राहील्याने निर्यातक्षम द्राक्षबागांना त्याचा फायदाच झाला. आॅक्टोबर नंतर नोव्हेंबरमध्ये हवामान स्वच्छ असल्याने द्राक्षांना फुलोरा व काही ठिकाणी मणींची अवस्था होती. मध्यंतरी अचानक ढगाळ हवामान होवून पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी, नाशिक, निफाड व इगतपुरी तालुक्यात झाल्या होत्या. मात्र हा पाऊस कोणत्या कारणांमुळे झाला, का झाला, पावसाचे नेमके कारण समजू शकले नव्हते. नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असल्याुमळे द्राक्षांवर रोगाचा पार्द्रुभाव होवू नये, म्हणून शेतकºयांना द्राक्ष बागांमध्ये धूर व किटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. द्राक्ष पिकाखालील क्षेत्र ५२ हजार ३८६ हेक्टर असून, त्यात सर्वाधिक निफाड तालुक्यात १९ हजार ९६६ हेक्टर त्यानंतर दिंडोरीत १५ हजर १६७ हेक्टर व नाशिकमध्ये ११ हजार ६७१ हेक्ट तसेच चांदवड तालुक्यात ३ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र आहे. यात थॉमसन सिडलेस, सोनाका, तास-इ- गणेश, एच-५, क्रिमसन, फनटासी क्लोन-२ या द्राक्ष जातींची लागवड केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत कळवण, सटाणा, चांदवड व देवळा या भागातील अर्ली द्राक्षांची जवळपास ४० कंटेनरची निर्यात श्रीलंका व रशिया या देशांमध्ये झाली होती. यावर्षी काढणीला आलेल्या अर्ली द्राक्षांची आतापर्यंत १५ कंटेनरमधून ३३ हजार ६३६ मेट्रीक टन द्राक्षांची निर्यात होवू शकल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकुण या हंगामात ७० ते ८० द्राक्ष कंटेनरची निर्यात झाली आहे.

 

Web Title: The effect of cold weather on grape exports is minimal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.