ग्रामीण भागात उष्णतेचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:15 AM2021-03-31T04:15:15+5:302021-03-31T04:15:15+5:30
दंडात्मक कारवाईकडेही दुर्लक्ष नाशिक : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असले तरी त्याचा गर्दीवर परिणाम होत नसल्याचे दिसून येत ...
दंडात्मक कारवाईकडेही दुर्लक्ष
नाशिक : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असले तरी त्याचा गर्दीवर परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. दिवसभर शहरातील विविध भागात गर्दी दिसुन येते. प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई करुनही अनेक नागरिक विनाकारण बाहेर फिरताना दिसतात. यामुळे अनेक ठिकाणी वर्दळ दिसुन येते.
वीजपुरवठा खंडित केल्याने नाराजी
नाशिक : राज्य वीज वितरण कंपणीने ऐन उन्हाळ्यात थकबाकीपोटी काही शेतकऱ्यांचा पुरवठा खंडित केल्याने त्यांना पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. वीज वितण कंपनीने थकबाकी भरण्यासाठी मुदत ठरवून द्यावी त्यानंतर कडक कारवाईचे धोरण अवलंबावे अशी मागणी करण्यात येत आहे.
खासगीकरणाच्या निर्णयामुळे नाराजी
नाशिक : केंद्र शासनाने बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. खासगीपेक्षा राष्ट्रीयीकृत बँकांनी ग्रामीण भागाच्या विकासात अधिक योगदान दिले असल्याने या बँकांचे खासगीकरण करु नये अशी मागणी बॅंक कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.
रुग्णवाहिकांच्या फेऱ्या वाढल्या
नाशिक : कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने शहरातील ॲम्ब्युलन्सच्या फेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.दिवसभर शासकीय, खासगी आणि संस्था संघटनांच्या रुग्णवाहिका रुग्णांना सेवा पुरवत असल्याचे दिसुन येत आहे. रुग्णवाहिकांच्या दरातही काहीअंशी वाढ झाल्याने नागरिकांना भूर्दंड सहन करावा लागत आहे.
शहरातील रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील
नाशिक : कोविड रुग्ण संख्येमुळे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होणे मुश्कील झाले आहे. शासकीय अणि मनपा रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण उपचार घेत असल्याने बेड उपलब्ध होणे कठीण झाले आहे. महापालिकेन त्यांच्या रुग्णालयात खाटांची संख्या वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे.
मंगल कार्यालय व्यावसायिक अडचणीत
नाशिक : गत वर्षापासून कोरोनाचे संकट घोंगावत असून यामुळे विवाह सोहळ्यांवर निर्बंध आल्याने लॉ्न्स , मंगल कार्यालय व्यावसायिक पूर्णपणे अडचणीत आले आहेत. ऐन लग्नसराईत या व्यावसायिकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
बसफेऱ्या कमी असल्याने नाराजी
नाशिक: शहरातील बस फेऱ्यांची संख्या कमी केल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. रिक्षाचालकांनी मोठ्या प्रमाणात दरवाढ केली ैअसल्याने अनेकांना रिक्षाने प्रवास करणे परवडत नाही. बसची संख्याही कमी असल्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बस फेऱ्या वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.
निर्णय घेतांना गरिबांचा विचार करावा
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षापासून मोलमजुरी करणाऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला नवीन रोजगार मिळणे कठीण झाले आहे. त्यात आता पुन्हा रुग्णसंख्य वाढल्याने शासन लॉकडाऊनचा विचार करत असल्याने नाराजी व्यक्त केली जात असून हा निर्णय घेण्यापुर्वी गोरगरिबांचा विचार करावा अशी मागणी करण्यात येत आहे.