शिक्षकांच्या आपसी बदल्यांना लागणार ‘ब्रेक’ स्थायी समितीचा ठराव ठरणार प्रभावी : पत्रांचा अन्वयार्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:19 AM2017-08-03T00:19:36+5:302017-08-03T00:44:50+5:30
नाशिक : शिक्षकांच्या आपसी बदल्यांमध्ये अर्थपूर्ण झाल्याचा आरोप करीत या बदल्यांची कार्यवाही रद्द करण्यात यावी, त्यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात यावे, असा स्थायी समितीत ठराव झालेला असताना आता आपसी बदल्यांच्या आदेशाची कार्यवाही मागील दाराने सुरू होणार असल्याची चर्चा आहे. अर्थात न्यायालयाचे व ग्रामविकास विभागाने पाठविलेल्या पत्रांचा सोयीचा अर्थ काढून या २२७ शिक्षकांच्या समुपदेशनाच्या नावाखाली अर्थपूर्ण घडामोडींनी बदल्या केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

दरम्यान, या सर्व बदलीपुराणामागे कसमादे परिसरातील जिल्हा परिषदेच्या एका माजी पदाधिकाºयाची महत्त्वाची भूमिका असल्याची व त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातील एक शिक्षक महत्त्वाचा आशेचा ‘किरण’ ठरल्याचे बोलले जाते. या सर्व घडामोडीत ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठ पातळीवर अधिकारी व एका वजनदार नेत्याकडेही अंगुलीनिर्देश करण्यात येत असल्याची चर्चा आहे.
ग्रामविकास विभागातील काही वरिष्ठ अधिकाºयांना या बदल्यांमागील ‘गोम’ लक्षात आल्याने त्यांचा अशा प्रकारचे परिपत्रक काढण्यास विरोध होता; मात्र कसमादे परिसरातील या माजी पदाधिकाºयाने वजनदार नेत्याच्या मागे पाठपुरावा करून हे पत्रक काढून त्याचा सोयीचा अर्थ काढून लगोलग दोनशेहून अधिक शिक्षकांच्या बदल्यांची समुपदेशनाने कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाला तत्पर केले; मात्र या सर्वांची बोंब झाल्यावर शिक्षक बदल्या इतक्या शांततेत कशा? यामागे काही तरी काळेबेरे असल्याचे सांगत स्थायी समितीतील सदस्यांनी या बदल्यांची कार्यवाही रद्द करावी, तसे बदल्यांचे आदेश काढू नयेत, यासाठी शासनाकडून मार्गदर्शन मागवावे.
मार्गदर्शन आल्यानंतर आपसी शिक्षक बदल्यांची कार्यवाही करावी, असा ठराव संमत केला आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यासंदर्भात काय भूमिका घेतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.वेळेत कार्यवाही अशक्यया वर्षाच्या सुरुवातीलाच शासनाच्या सचिवांनी न्यायालयात शिक्षकांच्या आपसी बदल्यांबाबत वेळेत कार्यवाही करता येणे शक्य नसल्याचे लेखी दिले होते. तोच धागा पकडत न्यायालयाने शिक्षकांच्या नियमित बदल्या करण्यापूर्वी या आपसी शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही करण्याबाबत विचार करावा, असे म्हटले होते. तसेच ग्रामविकास विभागानेही तातडीने यासंदर्भात नाशिक जिल्हा परिषदेला एक पत्र पाठवून आपसी शिक्षक बदल्यांची कार्यवाही करण्याबाबत सूचित केले होते.