आरोग्यसेवेत प्रभावी रूग्णसंवाद महत्त्वाचा : राजेश कोटेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:29 AM2018-12-11T01:29:34+5:302018-12-11T01:29:58+5:30

विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांची पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी समाजाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचले आहेत, आता त्यांनी आपले पाय जमिनीवर ठेवून समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी सामाजिक भान ठेवून काम करण्याचे आवाहन करतानाच रुग्णांशी हास्यमुख संवाद साधल्यास रुग्णांच्या प्रकृतीत जलद सुधारणा होण्यास त्याचा निश्चित फायदा होईल, असा संदेश केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

 Effective Patients in Health Sector Important: Rajesh Kottecha | आरोग्यसेवेत प्रभावी रूग्णसंवाद महत्त्वाचा : राजेश कोटेचा

आरोग्यसेवेत प्रभावी रूग्णसंवाद महत्त्वाचा : राजेश कोटेचा

Next

नाशिक : विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांची पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी समाजाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचले आहेत, आता त्यांनी आपले पाय जमिनीवर ठेवून समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी सामाजिक भान ठेवून काम करण्याचे आवाहन करतानाच रुग्णांशी हास्यमुख संवाद साधल्यास रुग्णांच्या प्रकृतीत जलद सुधारणा होण्यास त्याचा निश्चित फायदा होईल, असा संदेश केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
महाराष्ट्र आरोय विज्ञान विद्यापीठाच्या धन्वंतरी सभागृहात सोमवारी (दि.१०) कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेत विद्यापीठाचा १८ वा पदवीदान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे भारतीय चिकित्सा कें द्रीय समितीचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी, भारतीय दंत परिषदेचे अध्यक्ष डॉ. दिबेंदू मुजुमदार, प्रति कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण आदी उपस्थित होते.
वैद्य राजेश कोटेचा म्हणाले, पदवी प्राप्त करून बाहेर पडणारे विद्यार्थी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे दूत म्हणून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर स्वत:सोबतच विद्यापीठाची प्रतिष्ठा सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. आरोग्य विद्यापीठाने देशात आपले वेगळे स्थान निर्माण केले असून, विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीचे जामनेर विद्यापीठानेही अनुकरण केले असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षणाचे नेतृत्व करणारे राज्य असून, येथे सर्वाधिक वैद्यकीय, युनानी महाविद्यालये असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी सर्वाधिक आयुर्वेद महाविद्यालये संलग्न असल्याचे वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितले.
दरम्यान २०१७-१८ शैक्षणिक वर्षात विद्यापीठातून पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या व आंतरवासीयता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या एकूण आठ हजार ४६६ विद्यार्थ्यांना पदव्याप्रदान करण्यात आल्या.
यात आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे ३६८, दंत विद्याशाखा पदवीचे एक हजार ६८५, आयुर्वेद विद्याशाखेचे ५९६, युनानीचे ४८, होमिओपॅथीचे ९११, पदव्युत्तर विद्याशाखाचे (एम.डी. मेडिकल) ९२६, एमएस मेडिकलचे ४४६, पदव्युत्तर पदविके चे २६२, डी. एम. विद्याशाखेचे ५१, एम.सी.एच.चे ५४, एम.एस.सी. मेडिकलचे बायोमेट्रिकचे ०३, एम.बी.ए.चे ९२६ , एम.पी.एच.चे ०७, पदव्युत्तर दंत व पॅरामेडिकलचे ७२९, पदव्युत्तर आयुर्वेद व युनानीचे २३४, पदव्युत्तर होमिओपॅथीचे ५६, पदव्युत्तर तत्सम विद्याशाखांचे ३२५ पदवी तत्सम विद्याशाखेचे १७१४ विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करतानाच यातील विविध शाखांमधून गुणवत्ता प्राप्त ५९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले. त्यासोबतच संशोधन पूर्ण करणाऱ्या १६ विद्यार्थ्यांना पीच.डी प्रदान करण्यात आली. यावेळी प्राध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते.
डॉक्टर आणि रुग्णांमधील अंतर्गत विवादाचे संबंध समाजाची समस्या बनत आहे. काही वेळा आपण आपली मर्यादा ओलांडतो. याचा गांभीर्याने करणे गरजेचे आहे. शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आहे, हे वास्तव असले तरी समाजाप्रती सेवाभावनेतून आर्थिक दुर्बल व ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देणे आपल्या कर्तव्यदक्षतेचा भाग आहे.
-डॉ. दिवेंदु मुझुमदार, अध्यक्ष, भारतीय दंत परिषद
नाशिकच्या चौघांना सुवर्णपदक
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात नाशिकच्या चार विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले आहे. यात वैद्यराज ज्वालाप्रसाद शर्मा शास्त्री भीष्माचार्य सुवर्णपदकासह स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब लहानकर स्मृती सुवर्णपदक, अन्नपूर्णा माधवराव लखपती, सुवर्णपदकासह आयुर्वेद महाविद्यालयाच्या दिव्या दीपक पाटील हिने तीन सुवर्णपदकांची कमाई केली. रोहिनी विठ्ठल पाटील हिने पी.डी. महाजन सुवर्णपदक, कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या गायत्री प्रवीण मल्होत्रा हिने डॉ. अनी जॉन मुथीथोडाथील सुवर्णपदक व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या इंटरपॅथीच विभागीतल आदिती अरविंद शेरळ हिने डॉ. यू. के. सेठ सुवर्णपदक पटकावले आहे, तर नाशिकचे डॉ. ज्ञानदेव चोपडे यांना पीएच.डी पदवीप्रदान करण्यात आले.
भारतात लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यातही सुपर स्पेशालिटी तज्ज्ञांची कमतरता अधिक आहे, असे असताना दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाºया डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढवून देण्याची गरज आहे. आजच्या परिस्थितीत वैद्यकीय पदवी प्राप्त करणे विद्यार्थ्यांसाठी एतिहासिक क्षण आहे. प्रत्येकाला वैयक्तिक यश प्रिय असले तरी ते परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वत: सोबतच कटुंबाच्या सन्मानासाठी सेवाभावनेतूनच काम करण्याची गरज आहे.
- दिलीप म्हैसेकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला एक महत्त्वाचे वळण मिळणार आहे. यापुढे आरोग्यसेवेच्या दृष्टीने ते समाजाचा महत्त्वाचा भाग झाले आहेत. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी सेवा ही या वैद्यकीय क्षेत्राचा कणा आहे हे विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवण्याची गरज असून वैद्यकीय व्यवसाय करताना सेवाभाव विसरून चालणार नाही. हे नेहमी लक्षात ठेवून समाजाची सेवा करा.
-वैद्य जयंत देवपुजारी, अध्यक्ष, भारतीय चिकित्सा के ंद्रीय समिती

Web Title:  Effective Patients in Health Sector Important: Rajesh Kottecha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.