मोक्षकाष्ठाचा वृक्षतोडीवर प्रभावी उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:41 AM2018-06-05T00:41:24+5:302018-06-05T00:41:24+5:30
पारंपरिक अंत्यसंस्काराच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होतोे. त्यासाठी वृक्षतोडही अधिक प्रमाणात केली जाते. जरी अधिकृतरीत्या ठेका घेऊन वृक्षांवर कु-हाड चालविली जात असली तरी पर्यावरणाचा ºहास हा होतोच. त्यामुळे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची संकल्पना नागपूरमधील नौदलातील सेवानिवृत्त पर्यावरणप्रेमी विजय लिमये यांनी पुढे आणली.
पारंपरिक अंत्यसंस्काराच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होतोे. त्यासाठी वृक्षतोडही अधिक प्रमाणात केली जाते. जरी अधिकृतरीत्या ठेका घेऊन वृक्षांवर कुºहाड चालविली जात असली तरी पर्यावरणाचा ºहास हा होतोच. त्यामुळे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची संकल्पना नागपूरमधील नौदलातील सेवानिवृत्त पर्यावरणप्रेमी विजय लिमये यांनी पुढे आणली. संस्थेने महापालिका प्रशासनापुढे ही संकल्पना मांडली असून, लवकरच महापालिकेच्या माध्यमातून हा सकारात्मक पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागपूरमधील रहिवासी लिमये यांनी इको लिव्हिंग फाउण्डेशनची २००५ साली स्थापना करून पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची संकल्पना मांडली. या संकल्पनेचा त्यांनी राज्यभर प्रचार-प्रसार केला. राज्यातील सुमारे १८ शहरांमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अमरधाममध्ये अंत्यसंस्काराची पर्यावरणपूरक पद्धत राबविली जात आहे. संस्थेचे शहरातील कार्यकर्ते मिलिंद पगारे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन या संकल्पनेबाबत माहिती दिली. याबाबत ंंमनपा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, निविदाप्रक्रियेत हा नवीन पर्याय आहे. लवकरच या पर्यायाच्या अंमलबजावणीचा विचार होणार असल्याचे संकेत मुंढे यांनी दिल्याचे पगारे यांनी सांगितले. अंत्येष्टीच्या पारंपरिक दहन पद्धतीलाच अनुसरून शेतकचºयापासून तयार केलेल्या मोक्षकाष्ठ (ब्रिकेट्स) द्वारे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रभावी यशस्वी पर्याय पुढे आला. या धर्तीवर इको फ्रेण्डली लिव्हिंग फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील पंचवटी अमरधाममध्ये पहिला पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रयोग राबविला गेला. या प्रयोगाद्वारे एकूण साडेसहाशे किलो जळाऊ लाकू ड वाचविण्यास मदत झाली होती.
अशी आहे मोक्षकाष्ठ संकल्पना..
मोक्षकाष्ठ संकल्पना पर्यावरणपूरक आहे. या संकल्पनेतून शेतकºयांना रोजगारही सहज उपलब्ध होऊ शकतोे. शेतात पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणारा शेतकचरा तेथेच न जाळता त्यापासून मोक्षकाष्ठ बनवून अंत्यसंस्कारासाठी त्याचा वापर करता येतो. यासाठी शेतकरी शेतातील कचºयाची थेट विक्री करू शकतात. शेतकचरा यंत्रात टाक ल्यानंतर त्याचे गोलाकार लहान आकाराचे ओंडक्याच्या स्वरूपात ठोकळे तयार होतात. त्याचाच वापर अंत्यसंस्कारासाठी करता येतो.