यू-ट्यूबसह समाजमाध्यमांचा मतदानवाढीसाठी प्रभावी वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:10 PM2019-10-20T23:10:00+5:302019-10-21T00:31:29+5:30
कोणताही संदेश प्रभावीपणे द्यायचा असेल तर सोशल मीडियाचा वापर करणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेत निवडणूक आयोगाने या माध्यमांचादेखील प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच ‘मतदान करा’ हा संदेश देण्यासाठी आयोगाकडून यू-ट्यूबचीदेखील मदत घेण्यात येत आहे.
नाशिक : कोणताही संदेश प्रभावीपणे द्यायचा असेल तर सोशल मीडियाचा वापर करणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेत निवडणूक आयोगाने या माध्यमांचादेखील प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच ‘मतदान करा’ हा संदेश देण्यासाठी आयोगाकडून यू-ट्यूबचीदेखील मदत घेण्यात येत आहे.
समाजमाध्यमांचा गवगवा असलेल्या काळात एखाद्या विषयाबद्दल जनजागृती करायची असल्यास यू-ट्यूबसारखे माध्यम प्राधान्याने वापरले जाऊ शकते, हे ओळखून त्याचा वापर करून घेण्याचे धोरण आयोगाने अवलंबले आहे. मतदानाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. नाशिकमध्ये वोट कर नाशिककर ही संकल्पना जिल्हाधिकाऱ्याकडून राबविण्यात आली़ फ्लॅशमॉब, पथनाट्य अशा माध्यमांचा यापूर्वी वापर केला जात होता. मात्र अखेरच्या टप्प्यात अधिक झटपट आणि प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी आयोगाकडून यू-ट्यूबर्सचीही मदत घेतली जात आहे.
प्रथम मतदात्यांचा आकर्षणबिंदू
अनेक तरु ण मंडळी त्यांच्या पहिल्या वा दुसºया मतदानासाठी उत्सुक असतील. त्यात उत्तर महाराष्टÑात सुमारे लाखभर नव्या मतदारांची भर पडली आहे. अशावेळी तरु णांना आपल्याशा वाटणाºया यू-ट्यूबवरून मतदानाबद्दल जनजागृती करणारे व्हिडीओ अपलोड करवून घेण्यास आयोग प्रयत्नशील आहे. अर्थात निवडणूक आयोगाकडून सांगितले जाण्याआधी अनेक मराठी यू-ट्यूबर्सनी ‘नक्की मतदान करा’ असं आवाहन करणारे व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा आहे़