कार्य कर्तृत्वाने अटलजींचा सर्वसामान्यांवर प्रभाव : माधव भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:27 PM2018-08-22T23:27:18+5:302018-08-23T00:16:35+5:30

संपूर्ण देशात खेडोपाडी भारतीय जनता पक्ष पोहचविण्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सिंहाचा वाटा आहे. मात्र पार्टीपेक्षा देश मोठा हे अटलजींनी आपल्या कार्यातून अनेकवेळा दाखवून दिले आहे,

 Effectiveness of Atalji's work by profession: Madhav Bhandari | कार्य कर्तृत्वाने अटलजींचा सर्वसामान्यांवर प्रभाव : माधव भंडारी

कार्य कर्तृत्वाने अटलजींचा सर्वसामान्यांवर प्रभाव : माधव भंडारी

Next

नाशिकरोड : संपूर्ण देशात खेडोपाडी भारतीय जनता पक्ष पोहचविण्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सिंहाचा वाटा आहे. मात्र पार्टीपेक्षा देश मोठा हे अटलजींनी आपल्या कार्यातून अनेकवेळा दाखवून दिले आहे, आपल्या कार्य कर्तृत्वामुळे अटलजींचा सर्वसामान्यांवर मोठा प्रभाव होता, असे प्रतिपादन भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले.  मोटवानीरोड उत्सव मंगल कार्यालयात सर्वपक्षीयांच्या वतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत बोलताना भंडारी म्हणाले की, गेली ६०-६२ वर्ष अटलजींनी राजकारण केले. गेल्या १०-१२ वर्षांपासून अटलजी सामाजिक जीवनापासून अलिप्त राहूनसुद्धा त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकाकुल झाला हा मोठेपणा सहजासहजी कोणाला लाभत नाही, असे भंडारी यांनी सांगितले. यावेळी राष्टय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह प्रदीप केतकर, नगरसेवक संभाजी मोरूस्कर, प्रशांत दिवे, आशा तडवी, अशोक सातभाई, सुभाष घिया, अस्लम मणियार, रामू जाधव, प्रमोद बागुल, विक्रम कदम, रवींद्र मालुंजकर, रोहन देशपांडे, शाम गोहाड आदिंनी श्रद्धांजली वाहिली. सूत्रसंचालन अंबादास कुलकर्णी यांनी केले. शोकसभेला प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेवक शरद मोरे, दिनकर आढाव, सूर्यकांत लवटे, डॉ. सीमा ताजणे, मीरा हाडगे, अंबादास पगारे, योगेश भगत, संजय घुले, गजानन तितरे, अ‍ॅड. सुहास पाठक, सुहास बिडवई, रमेश औटे, उन्मेष गायधनी समीर शेख, राजेंद्र ताजणे, ज्ञानेश्वर भोसले आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title:  Effectiveness of Atalji's work by profession: Madhav Bhandari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.