राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठासाठी प्रयत्न, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची नाशकात घोषणा
By Suyog.joshi | Updated: February 1, 2025 18:16 IST2025-02-01T18:15:23+5:302025-02-01T18:16:10+5:30
तब्बल पाच वेळा सिन्नर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अन यंदा मंत्रिपद लाभलेल्या कोकाटे यांचा शहर-जिल्ह्यातील स्नेहीजनांच्यावतीने एचपीटी महाविद्यालयाच्या गुरुदक्षिणा सभागृहात हृदय सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना ते बाेलत होते.

राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठासाठी प्रयत्न, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची नाशकात घोषणा
नाशिक (सुयोग जोशी) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नेहमीच अभिमान वाटतो. नवनवीन व प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, माझी शेतकऱ्यांशी नाळ जोडली असून येत्या काळात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने शेती विकसित करता यावी यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची घोषणा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी (दि. १) केली.तब्बल पाच वेळा सिन्नर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अन यंदा मंत्रिपद लाभलेल्या कोकाटे यांचा शहर-जिल्ह्यातील स्नेहीजनांच्यावतीने एचपीटी महाविद्यालयाच्या गुरुदक्षिणा सभागृहात हृदय सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना ते बाेलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षिय नेते उपस्थित हाेते. यावेळी बोलतांना कोकाटे म्हणाले, देशातील ५० टक्के नागरिक हे शेती व्यवसायाशी संबंधित असून शेतीमध्ये अनेक आमुलाग्र बदल होतांना दिसत आहेत. शेतीतील नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून नवीन विकसित वाण, पीकपद्धती विकसित होत आहेत. या शेती उत्पादितांना त्यांच्या गाव, तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी विक्री व्यवस्था व बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पणन मंत्री यांच्यासमवेत चर्चा करून शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.
सेंद्रिय उत्पादने वाढविण्याची गरज
सेंद्रिय उत्पादने वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनीप्रयत्न केले पाहिजे. चांगल्या प्रकारचे अन्नधान्य पिकविले तरच आरोग्याला फायदा होईल. अन्यथा आपल्याला कॅन्सरसारख्या रोगाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे खाण्याकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला कोकाटे यांनी दिला. तृणधान्यांमधील पोषणूमुल्यांमुळे त्यांचे आहारातील आरोग्यविषयक महत्व अनन्यसाधारण आहे. हे लक्षात घेवून नागरिकांनी दैनंदिन आहारात तृणधान्यांचा समावेश वाढविणे आवश्यक असल्याचेही सांगितले.
मंत्रालयात सोमवारी बैठक
शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. आता ड्रोनद्वारे शेती तर रोबोटद्वारे औषध फवारणी केली जात आहे. त्याच अनुषंगाने मंत्रालयात सोमवारी (दि. ३) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतीत एआय तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत बैठकीचे आयाेजन करण्यात आल्याचेही कोकाटे यांनी सांगितले.