व्यापाऱ्यांना पॅकेज देण्यासाठी प्रयत्न :दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 10:13 PM2020-05-11T22:13:46+5:302020-05-11T23:29:25+5:30

नाशिक : कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक संकटातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांना उभारी मिळावी म्हणून करप्रणालीत शिथिलता आणावी, पतपुरवठ्यामध्ये लवचीकता आणून भांडवल उपलब्ध करून द्यावे आणि वीज बिले ही व्यावसायिकऐवजी औद्योगिक दराने आकारावीत, अशा प्रमुख मागण्या केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमवेत झालेल्या झूम क्लाउड मिटिंगमध्ये मांडण्यात आल्या.

 Efforts to give package to traders: Danve | व्यापाऱ्यांना पॅकेज देण्यासाठी प्रयत्न :दानवे

व्यापाऱ्यांना पॅकेज देण्यासाठी प्रयत्न :दानवे

googlenewsNext

नाशिक : कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक संकटातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांना उभारी मिळावी म्हणून करप्रणालीत शिथिलता आणावी, पतपुरवठ्यामध्ये लवचीकता आणून भांडवल उपलब्ध करून द्यावे आणि वीज बिले ही व्यावसायिकऐवजी औद्योगिक दराने आकारावीत, अशा प्रमुख मागण्या केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमवेत झालेल्या झूम क्लाउड मिटिंगमध्ये मांडण्यात आल्या. ‘यावेळी मांडण्यात आलेल्या बहुतांश मागण्या रास्त असून, सरकारमधील वरिष्ठांपर्यंत पोहोचवून व्यापारीवर्गाला दिलासा देण्यासाठी पॅकेज देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी दानवे यांनी दिले.
महाराष्ट्राच्या सर्व विभागांमधील व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी व मान्यवर या बैठकीत सहभागी झाले होते. त्यात नाशिक सिटिझन्स फोरमचे अध्यक्ष शहेमंत राठी आणि संस्थापक अध्यक्ष विक्रम सारडा यांच्यासह मानसिंग पवार (औरंगाबाद) अरुण दांडेकर (सांगली) यांच्यासह अन्य ज्येष्ठ व्यापारी प्रतिनिधींचा समावेश होता.
यावेळी राठी यांनी ‘सद्यस्थितीतून सावरण्यासाठी व्यापाºयांना अवधी आणि सवलती अशा दोहोंची गरज आहे. म्हणूनच खेळत्या भांडवलासाठी क्रेडीट लिमिट हे २५ टक्क्यांपर्यंत वाढवून द्यावे. व्यापाºयाला करण्यात आलेल्या पतपुरवठ्याचे व्याजदर कमी करावेत आणि परतफेडीसाठी वर्षभराची मुदत ठरवून द्यावी.’ लॉकडाउनबाबत केंद्रीय, राज्य आणि स्थानिक अशा विविध स्तरांवरून दिल्या जाणाºया निर्देशांमुळे व्यापाºयांचा गोंधळ उडत असून, या निर्देशांमध्ये स्पष्टता आणि एकवाक्यता असावी, अशीही मागणी केली, तर विक्रम सारडा यांनी ‘जीएसटी अदा करण्यासाठीची मुदत सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात यावी.

Web Title:  Efforts to give package to traders: Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक