शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 05:29 PM2020-09-14T17:29:53+5:302020-09-14T17:30:41+5:30

सिन्नर : २० टक्के अनुदानित तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या सर्व शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री व उपसमितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

Efforts to provide grants to teachers as per prevailing rules | शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देताना एस. बी. देशमुख, सुभाष पवार, शरदचंद्र काकुस्ते, दशरथ जाधव, गोकुळ महाले, एस.डी. पवार आदी.

Next
ठळक मुद्देबाळासाहेब थोरात : शिक्षक संघटनांकडून विविध मागण्यांचे निवेदन

सिन्नर : २० टक्के अनुदानित तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या सर्व शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री व उपसमितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

नाशिक जिल्हा कायम विनाअनुदानित शाळा कृतीसमितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संगमनेर येथे थोरात यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. यावेळी पदवीधर आमदार सुधीर तांबे यांचीही भेट घेतली. त्यांनी आपली भूमिका मांडताना शिक्षकांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान मिळण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. शिक्षकांकडून उपाशीपोटी काम करून घेता येणार नाही. त्यांच्या सर्व समस्या सुटल्या पाहिजे. प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान मिळाले पाहिजे. मूल्यांकन झालेल्या व न झालेल्या शाळांना अनुदान देणे, जुनी पेन्शन योजना सरसकट सर्वांना लागू करणे या व इतर समस्या सोडविण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे, असे तांबे म्हणाले. कृतीसमितीचे अध्यक्ष भरत भामरे यांनी मंत्रालयीनस्तरावर अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार पात्र प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी नुकतीच एक उपसमिती नेमली व आपण त्या समितीचे अध्यक्ष आहात, असे शिष्टमंडळाने थोरात यांना साांगितले. यावर थोरात यांनी सांगितले, की अजून समितीमध्ये कोण कोण आहेत हे निश्चित होणे बाकी आहे. मात्र मी माझ्या स्तरावर सर्व प्रकारची माहिती शासनापर्यंत पोहोचवणार आहे व उपसमिती गठित झाली की हा विषय मी स्वत: प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या कोरोनासारख्या महामारीमध्ये राज्यावर आलेले संकट पाहता आपला विषय मार्र्गी लावण्याचा निश्चितच आमचा मानस आहे.
यावेळी ठाकूर, मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, गोरख कुलधर, कांतीलाल नेरे, मनोज वाकचौरे, सोमनाथ जगदाळे, बाबासाहेब खरोटे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Efforts to provide grants to teachers as per prevailing rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.