पंधरा गुंठ्यात वांग्याचे लाखाचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 08:46 PM2020-07-04T20:46:23+5:302020-07-04T23:22:36+5:30
कोरोनाच्या संकटाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला होता. पण दरेगव येथील युवा शेतकºयांनी हतबल न होता नवा प्रयोग करण्याचा ध्यास घेतला. तसेच वांग्याचे अल्पशा क्षेत्रात भरघोस उत्पादन घेऊन लाखो रुपये कमविले आहेत. अवघ्या २० ते २५ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. असा उपक्रम इतर शेतकºयांनी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दरेगाव : मनमाड येथून जवळच असलेल्या चांदवड तालुक्यातील कुंदलगाव येथे पंधरा गुंठ्यांतील वांग्याच्या शेतीत भरघोस उत्पादन व लाखाच्यावर आर्थिक उत्पन्न प्रयोगशील शेतकºयांना मिळाले आहे.
कुंदलगाव येथील शेतकरी कुटुंबातील काका - पुतणे विलास बाळू नागरे व किशोर संजय नागरे यांनी फेब्रुवारी दरम्यान वांग्याची लागवड केली होती. किशोरला कॉलेजला सुट्या असल्याने शेतीकडे लक्ष देण्याची इच्छा झाली. वेळेचा उपयोग करून घेत काकांच्या मदतीने त्याने आधुनिक तंत्रज्ञान व मेहनतीच्या जोरावर पंधरा गुंठ्यांत वांग्याची शेती केलेली आहे.
सध्या हे शेतकरी बाजार समितीत कधी लिलाव तर बाजारात हात विक्र ीने वांगी विक्री करत आहेत. तसेच उन्हाळ्यात वांगेचे संगोपन व्यवस्थापन व वांगी पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करून वांगे पिकविण्याचे धडे इतर शेतकºयांनाही देत आहेत. त्यांना कमीत कमी २० हजार रुपये खर्च वांग्याचे उत्पादन घेण्यासाठी आला होता. विलास नागरे व किशोर नागरे यांनी शेतात उन्हाळ्यात घेतलेल्या वांगी व भाजीपाला पिकांच्या शेतीच्या प्रयोगाचे परिसरात कौतुक होत आहे. वांग्याची शेती पाहण्यासाठी व त्यातील तंत्र शिकण्यासाठी परिसरातील युवा शेतकरीवर्ग कुंदलगाव येथे हजेरी लावत असल्याचेही नागरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.इतरांना आवाहन
दोन्ही तरु णांनी जिद्द चिकाटी मनी बाळगून पंधरा गुंठ्यांत एक लाखापेक्षा अधिक उत्पादन काढले आहे. शेतकººयांनी भाजीपाला पिकांची लागवड केल्यास भरघोस उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे इतर शेतकºयांनीही असा प्रयोग करण्याचे आवाहन या युवकांनी केले आहे.