कांद्यापेक्षा वांगी, बटाटे महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:13 AM2021-01-04T04:13:06+5:302021-01-04T04:13:06+5:30
--चौकट--- केळी १० रुपये किलो किरकोळ बाजारात केळी डझनवर विकली जात असली तरी घाऊक बाजारात केळी ४ रुपयांपासून १० ...
--चौकट---
केळी १० रुपये किलो
किरकोळ बाजारात केळी डझनवर विकली जात असली तरी घाऊक बाजारात केळी ४ रुपयांपासून १० रुपये किलोने विकली जात आहे. मृदुला डाळिंब १५ रुपयांपासून ७५ रुपये किलो विकले जात आहे. नाशिक बाजारात डाळिंबाच्या आवकवर खूपच परिणाम झाला आहे.
---चौकट -
सर्वच तांदळाची निर्यात वाढली
यावर्षी बासमतीसह कोलम आणि इतर सर्वच तांदळाची निर्यात वाढली असल्याने तांदळाच्या दरामध्ये किरकोळ बाजारात दहा ते बारा रुपयांनी वाढ झाली आहे. मुहूर्तालाच तांदळाचे भाव ४१०० वरुन ५१०० क्विंटलपर्यंत गेले आहेत.
---चौकट ----
फळभाज्यांना मागणी
वांगी, कारले, गिलके, दोडका या फळभाज्यांना चांगली मागणी असून घाऊक बाजारात या भाज्यांना चांगला दर मिळत आहे. कांद्याच्या दरात मात्र घसरण झाली आहे. लाल कांदा १२५० पासून ३१०० रुपये क्विंटलपर्यंत विकला जात आहे.
--कोट----
किराणा बाजारात आता ग्राहकीला सुरुवात झाली असून आता खरेदीला बऱ्यापैकी सुरुवात होईल. तेलाच्या भावात होणाऱ्या वाढीमुळे आज तेल नेमके कोणत्या भावाने विकावे असा प्रश्न निर्माण होतो. तेल भाव वाढीच्या कारणाबाबतही संभ्रम आहे.
- प्रवीण संचेती, किराणा व्यापारी
--कोट ----
भाजीपाल्याचा उत्पादन खर्च वाढला आहे. मात्र त्या तुलनेत भाजीपाल्याला दर मिळत नाही. फवारणीसाठी लागणारी औषधे, विविध खते यांचे दर वाढले आहेत यामुळे आर्थिक ताळमेळ घालताना खूपच कसरत करावी लागते.
-विकास पगारे, शेतकरी
--कोट----
तेलाच्या दरांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. यामुळे महिन्याचे किराण्याचे गणित कोलमडले आहे. दर कमी होईपर्यंत गरजेपुरतेच तेल खरेदी करावे लागणार आहे. त्याचबरोबर वापरही जपून करावा लागणार आहे.
- शालिनी जाधव, गृहिणी