इजिप्तचा कांदा लासलगावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 01:29 AM2019-11-09T01:29:03+5:302019-11-09T01:29:25+5:30
बाजार समितीमध्ये एका व्यापाऱ्याने इजिप्त येथून आयात केलेल्या कांद्यापैकी शिल्लक राहिलेला तीस क्विंटल कांदा दोन वाहनांतून विक्रीसाठी आणला होता. त्या कांद्याला जास्तीत जास्त ३६३६ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. इजिप्तच्या कांद्याला जरी बाजारभाव मिळाला असला तरी त्या कांद्याचा रंग आणि चव ही भारतीय कांद्यापुढे फिकी असल्याने भारतीय कांद्यालाच देशासह इतरत्र मागणी असल्याचे बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले.
लासलगाव : बाजार समितीमध्ये एका व्यापाऱ्याने इजिप्त येथून आयात केलेल्या कांद्यापैकी शिल्लक राहिलेला तीस क्विंटल कांदा दोन वाहनांतून विक्रीसाठी आणला होता. त्या कांद्याला जास्तीत जास्त ३६३६ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. इजिप्तच्या कांद्याला जरी बाजारभाव मिळाला असला तरी त्या कांद्याचा रंग आणि चव ही भारतीय कांद्यापुढे फिकी असल्याने भारतीय कांद्यालाच देशासह इतरत्र मागणी असल्याचे बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले.
परतीच्या पावसाने लाल कांद्याचे झालेले नुकसान, त्यामुळे मंदावलेली आवक आणि उन्हाळ कांदा संपुष्टात येत असल्याने देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कमी होत असलेला कांद्याचा पुरवठा यामुळे बाजारभावात दररोज वाढ होत होती. त्यामुळे केंद्र सरकारने देशात पुरेसा कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी व्यापाऱ्यांना कांदा आयात करण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार लासलगाव येथील एका व्यापाºयाने इजिप्त येथून कांदा आयात केला होता. त्याचा मागणीनुसार पुरवठा केल्यानंतर त्यातील शिल्लक राहिलेला ३० क्विंटल कांदा त्या व्यापाºयाने लासलगाव बाजार समितीत दोन वाहनांतून विक्रीसाठी आणला होता. त्यातील एका वाहनाला ३६३६ रु पये प्रतिक्विंटल दर मिळाला. दुसºया वाहनातील कांद्याला ३५९० रुपये प्रतिक्विंटलला बाजारभाव मिळाला. कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने नुकताच कांदा आयातीचा निर्णय घेतला आहे़
कांदा आयात झाली तरी बाजारभावावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे़