विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या आयशरचालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 08:53 PM2020-08-17T20:53:59+5:302020-08-18T01:05:26+5:30
सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागातील एका गावातून सिन्नरकडे येण्यासाठी आयशर टेम्पोत बसलेल्या विवाहितेवर मोह शिवारात निर्जनस्थळी टेम्पो थांबवून अत्याचार करणाºया आयशर-चालकास एमआयडीसी पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यात अटक केली. प्रदीप संतोष काळे (२५) रा. भाबरडा, ता.जि. औरंगाबाद असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

पीडित विवाहिता आपल्या पाचवर्षीय मुलासह सिन्नर येथे येण्यासाठी सिन्नर-शिर्डी मार्गावर थांबली होती. सिन्नरजवळ आल्यानंतर आयशरचालकाने सिन्नर बायपासवरून नाशिकच्या दिशेने वेगात टेम्पो चालविला. सदरची बाब विवाहितेच्या लक्षात आल्यानंतर तिने टेम्पोचालकास गाडी थांबविण्यास सांगितले असता त्याने मोह शिवारात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास निर्जनस्थळी गाडी थांबवूून गाडीतच सदर महिलेवर अत्याचार केला व महिलेला मुलासह उतरवून देत पळून गेला.
घटनेनंतर पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन आयशरचालकाच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आयशर चालकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची नेमणूक करून तपासास सुरुवात केली होती. सदरच्या गुन्ह्यात आरोपीचे नाव-गाव नसल्याने तसेच आयशर टेम्पोचा नंबरही नसल्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे आव्हान उभे ठाकले होते. तपास पथकासह दिवसरात्र मेहनत घेऊन शिंदे येथील टोक प्लाझावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आयशर टेम्पोचा नंबर प्राप्त करून घेतल्यानंतर तपासाची चक्रे फिरवून पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, पोलीस शिपाई सुनील जाधव यांच्या पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील भाबरडा गावी सापळा रचून संशयित आयशरचालक प्रदीप संतोष काळे यास टेम्पोसह ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रहाटे करत आहेत.