सिन्नरला ईआयसीचे स्वतंत्र रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:23 AM2018-03-17T01:23:48+5:302018-03-17T01:23:48+5:30
वर्षभरापूर्वी सिन्नर औद्योगिक वसाहतीत सुरू करण्यात आलेल्या ईएसआयसी रुग्णालयात पुरेशा सुविधा मिळत नसल्याने रुग्णालय बंद करावे किंवा सिन्नरसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करावे या निमाच्या मागणीची दखल घेत लवकच तेथे प्राथमिक उपचार केंद्र सुरू करण्याचे आश्वासन कर्मचारी राज्य विमा निगमचे उपनिदेशक राकेश कुमार यांनी निमा शिष्टमंडळाला दिले.
सातपूर : वर्षभरापूर्वी सिन्नर औद्योगिक वसाहतीत सुरू करण्यात आलेल्या ईएसआयसी रुग्णालयात पुरेशा सुविधा मिळत नसल्याने रुग्णालय बंद करावे किंवा सिन्नरसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करावे या निमाच्या मागणीची दखल घेत लवकच तेथे प्राथमिक उपचार केंद्र सुरू करण्याचे आश्वासन कर्मचारी राज्य विमा निगमचे उपनिदेशक राकेश कुमार यांनी निमा शिष्टमंडळाला दिले. ईएसआयसी रुग्णालयाबाबत कामगारांच्या सततच्या तक्र ारींची दखल घेत निमा सिन्नर कार्यालयात कर्मचारी राज्य विमा निगमचे उपसंचालक एस. के. पांडे, सामाजिक सुरक्षा अधिकारी सुदीप वाजपेयी यांच्यासमवेत निमा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या ईएसआयसी रुग्णालयात कामगारांसाठी मंजूर असलेल्या सुविधा मिळत नाहीत. औषधसाठा उपलब्ध नसतो. त्यामुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून, औषधोपचार मिळत नसतील तर रुग्णालय बंद करून टाकावे अशी भावना कामगा-रांमध्ये असल्याने निमा पदाधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांना सांगितले. निमा सिन्नरचे उपाध्यक्ष आशिष नहार चिटणीस, सुधीर बडगुजर, किरण खाबिया, प्रवीण वाबळे, एस. के. नायर आदींनी कर्मचारी राज्य विमा निगमचे उपनिदेशक राकेश कुमार यांची भेट घेतली. त्यांनी सिन्नरला स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याची मागणी केली असता कार्यालय सुरू करण्यात येईल तसेच कामगारांचे अर्ज जमा करण्यासाठी निमा कार्यालयात ड्रॉप बॉक्स सुरू केले जाईल, असे आश्वासन कुमार यांनी दिले आहे.