ईद मुबारक! नाशिकमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 10:36 AM2019-06-05T10:36:07+5:302019-06-05T10:47:57+5:30

शहर व परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी झाली. मुख्य पोलीस कवायत मैदानासह १८ ठिकाणी सामुदायिक नमाज पठण झाले.

eid celebration in nashik | ईद मुबारक! नाशिकमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी 

ईद मुबारक! नाशिकमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी 

Next
ठळक मुद्देनांदेड - ईदगा मैदान येथे सामुहिक नमाज अदा करून ईद साजरी करण्यात आली यावेळी हजारो मुस्लीम बांधवांची उपस्थिती होती.पोलीस कवायत मैदानावर जामा मशिदीचे पेशेइमाम मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी नमाज पढविली.मुख्य नमाज पठणात सुमारे सव्वालाख मुस्लिम सहभागी झाले.

मालेगाव (नाशिक) - शहर व परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी झाली. मुख्य पोलीस कवायत मैदानासह १८ ठिकाणी सामुदायिक नमाज पठण झाले. पोलीस कवायत मैदानावर जामा मशिदीचे पेशेइमाम मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी नमाज पढविली. मुख्य नमाज पठणात सुमारे सव्वालाख मुस्लिम सहभागी झाले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

बुधवारी (5 जून) सकाळी साडेसातपासूनच मुस्लिमांचे जथ्थेच्या जथ्थे विविध वाहनातून नमाजपठण होत असलेल्या मैदानाकडे जात होते. मुख्य मैदानांकडे जाणारे जोडरस्ते पोलिसांनी लोखंडी बॅरेकेटींग लावून बंद केली होते. अवजड वाहनांना सकाळी अकरापर्यंत शहरात प्रवेश नव्हता.  कालीकुट्टी, सोनापुरा कब्रस्तान, सनाउल्ला मशीद, गोल्डनगर, अश्रफी इदगाह, सेंट्रल इदगाह, इस्तेमानगर, सवंदगाव इदगाह, म्हाळदे शिवार, अरकाबे इसालत-आयेशानगर आदींसह १८ ठिकाणी नमाजपठण झाले. 

मुख्य नमाजपठणा पुर्वी मौलाना मुफ्ती यांनी बयान करीत मार्गदर्शन केले. त्यांचा जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिह, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत आदींच्या हस्ते साफा बांधून सत्कार करण्यात आला. हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना गळा भेटून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय एकात्मता चौकात झालेल्या कार्यक्रमास ,प्रांताधिकारी शर्मा, अपर पोलिस अधिक्षक निलोत्पल, तहसिलदार चंद्रजीत राजपूत, उपअधिक्षक रत्नाकर नवले, अजित हगवणे,  शांतता समितीचे माधवराव जोशी, मधुकर केदारे, विजय पोफळे, हरिप्रसाद गुप्ता आदींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रमजान ईदचा उत्साहच न्यारा 

रमजान ईदची मुख्य नमाजपठण झाल्यानंतर शहरात पूर्व भागात ईदचा जल्लोष व उत्साह आढळून आला. यंत्रमाग कालपासूनच बंद होते. पुर्व भागातील दुकाने व हॉटेल, उपहारगृहांमध्ये मोठी गर्दी होती. मोसम चौपाटी, कॅम्प चौपाटी यावर मोठी गजबज होती. शहरातील सर्वच चित्रपटगृह हाऊसफुल होते.  ईदच्या पर्यटनाला उद्यापासून सुरुवात होईल. राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांसह परराज्यातही या काळात बहुसंख्य नागरीक पर्यटनाला जातात. महिला माहेरी जाऊन उद्या बाशी ईद साजरी करतात. आजचा महिलांचा दिवस पाहुण्यांच्या सरबराईत जातो. महिलांवर शिरखुर्मा बनविण्याची जबाबदारी असते. हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. अनेक हिंदू बांधव शिरखुर्म्याचा आस्वाद घेण्यासाठी पुर्व भागातील आपल्या मित्रांकडे गेले.

 

Web Title: eid celebration in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक