नाशिकरोडला ईदनिमित्त मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 01:02 AM2018-11-22T01:02:48+5:302018-11-22T01:03:08+5:30
परिसरात पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक बुधवारी (दि.२१) काढण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर आकर्षक देखावे सादर करण्यात आले. मिरवणूकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. जुने नाशिकप्रमाणे नाशिकरोड, वडाळागवातील मिरवणूक डीजेमुक्त असल्याचे दिसून आले.
नाशिकरोड : परिसरात पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक बुधवारी (दि.२१) काढण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर आकर्षक देखावे सादर करण्यात आले. मिरवणूकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. जुने नाशिकप्रमाणे नाशिकरोड, वडाळागवातील मिरवणूक डीजेमुक्त असल्याचे दिसून आले. मिरवणूकीला सकाळी गोसावीवाडीतून प्रारंभ झाला. मिरवणूक आंबेडकर पुतळा रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिटको चौक, मुक्तीधाममार्गे अनुराधा चौकात आली. सत्कार पॉईन्ट, देवळाली गाव, विहितगाव मार्गे देवळालीगाव, गाडेकर मळा येथे आल्यावर मिरवुणकीचा समारोप झाला. तेथे मुख्य प्रवक्ते सैय्यद याकुब रजा काद्री यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मौलाना मुस्ताक रजा, मौलाना शोएब, मौलाना जाफर, मौलाना मुफ्ती रहिमान रजा, मौलाना हारूण रशिद, मौलाना अब्दुल अजीज, मौलाना गुलजार अहमद, मौलाना जफर, मौलाना सैय्यद इरफान आदी उपस्थित होते. मिरवणुकीत मंडळांनी जगप्रसिध्द मशिदींचे तसेच सामाजिक उपक्रमावर आधारीत देखावे सादर केले होते. ईदच्या मिरवणुकीचे विविध पक्ष व संघटनांनी स्वागत केले. सरबत, खाद्य पदार्थांचे वाटप केले. सिन्नर फाटा येथे मनसेचे विभाग प्रमुख साहेबराव खर्जुल यांच्या वतीने मंडळांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
अनुराधा मित्र मंडळातर्फे स्वागत करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नगरसेवक सुर्यकांत लवटे, राजू लवटे आदी उपस्थित होते. भाजप आणि नाशिकरोडच्या मित्रमेळा परिवारातर्फे चित्ररथांचे स्वागत करून मिठाई वाटप करण्यात आली. आमदार बाळासाहेब सानप, प्रभाग सभापती पंडित आवारे, राजेंद्र ताजणे यांनी स्वागत केले. नगरसेविका डॉ. सीमा ताजणे, सुनंदा मोरे, नगरसेवक संभाजी मोरस्कर आदी उपस्थित होते.
या मंडळांचा सहभाग
मिरवुणकीत मोहम्मदिया एज्युकेशन सोशल ग्रुप अॅन्ड मल्टीपर्पज वेल्फेअर असोसिएशन, हिंद सोशल वेल्फेअर आॅर्गनायझेशन, अजमेरी ग्रुप, अलहुसेनी वेल्फेअर ट्रस्ट, संजेरी सरकार फ्रेन्डस सर्कल, चॉँदतारा मशिद फ्रेन्ड सर्कल, रजा सोशल ग्रुप, के. जी. एन. सोशल ग्रुप, हिंदुस्थान सोशल ग्रुप, टिपू सुल्तान फ्रेन्ड सर्कल, हनाफिया नवजवान कमिटी, नाशिकरोड देवळाली मुस्लिम खाटीक समाज आदी मंडळांनी सहभाग घेतला