सुरगाणा येथे ईद-ए-मिलाद साजरी
By admin | Published: January 5, 2015 01:12 AM2015-01-05T01:12:00+5:302015-01-05T01:12:28+5:30
सुरगाणा येथे ईद-ए-मिलाद साजरी
सुरगाणा- शहरात प्रथमच ईद-ए-मिलाद दूननबी सवाद्य चादर मिरवणूक उत्साहात काढून साजरी करण्यात आली.
येथील मशिदीपासून पवित्र चादर मिरवणुकीस सुरुवात झाली. प्रथमच साजरा केल्या जाणाऱ्या या उत्साहात मिरवणुकीच्या वेळी सजवलेले दोन उंट व घोडा हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. दोन्ही उंटावर मौलाना मुजाहिद आलम शेख व मौलाना सद्दाम हुसेन मकेरी हे विराजमान झाले होते.चादर मिरवणूक मेनरोड, आझादलेन, तेलीगल्ली, होळीचौक, माणीरोड मार्गे बारा बंगलाजवळील जलालशहा बाबा व जमालशहा बाबा यांच्या दर्ग्यापर्यंत पोहोचल्यावर विधिवत व अतिशय उत्साहात दर्ग्यावर चादर चढविण्यात आली. ईद-ए-मिलाद दूननबीनिमित्त काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत शमीद शेख, सलमान शेख, मुझफ्फर काझी, अबू मौलाना, मुस्ताक शहा, मेहमूद शहा, जावेद मनियार, मोहसिन शेख, मोहसिन काझी, राजूबाबा शेख, एजाज शेख, शकूर शहा, शमशुद्दीन शेख आदिंसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यादरम्यान पोलीस निरीक्षक सुरेश पारधी, उपनिरीक्षक अशोक गवळी व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.