लासलगावी घरातच साजरी होणार ईद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:06 PM2020-05-24T22:06:56+5:302020-05-24T22:07:40+5:30

रमजान ईदसारख्या पवित्र उत्सवाला एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाजपठण करून प्रशासनाला सहकार्य करावे व लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करून कोरोनाचा मुकाबला करण्यास महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन निफाडचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी यांनी केले आहे.

Eid will be celebrated at Lasalgaon | लासलगावी घरातच साजरी होणार ईद

लासलगाव पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत बोलताना निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी, समवेत सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे आदी.

Next

लासलगाव : शहरासह लासलगाव पोलीस हद्दीतील ३८ गावांतील मुस्लीम बांधवांनी कोरोनाबरोबर लढण्याकरिता लॉकडाउनचे पालन करण्याची आवश्यकता आहे. रमजान ईदसारख्या पवित्र उत्सवाला एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाजपठण करून प्रशासनाला सहकार्य करावे व लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करून कोरोनाचा मुकाबला करण्यास महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन निफाडचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी यांनी केले आहे.
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनामार्फत लासलगाव पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, हारूण शेख, नुरानी मशीदचे मौलाना मंजूर अहमद मिल्ली यांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळून रमजान ईदची नमाज घरीच अदा करण्याच आवाहन केले.
बैठकीस पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे आदी उपस्थित होते.

Web Title: Eid will be celebrated at Lasalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.