मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:46 PM2019-06-05T22:46:55+5:302019-06-05T22:51:14+5:30

मालेगाव : सामाजिक कार्यकर्ते, अधिकाऱ्यांनी घेतली गळाभेटमालेगाव : पवित्र रमजान ईद (ईद- उल-फित्र) निमित्त येथील कवायत मैदानावरील मुख्य इदगाहसह एकूण १८ ठिकाणी सामुदायिक नमाजपठण करण्यात आले.

Eid wishes to Muslim brothers | मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा

मालेगावी रमजान ईदनिमित्त मौलाना मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांचा सत्कार करताना अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत. समवेत जिल्हा पोलीसप्रमुख आरती सिंह, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपअधीक्षक अजित हगवणे, केवळ हिरे आदी.

Next
ठळक मुद्देसामूहिक नमाज अदा करण्यात आली.

मालेगाव : सामाजिक कार्यकर्ते, अधिकाऱ्यांनी घेतली गळाभेटमालेगाव : पवित्र रमजान ईद (ईद- उल-फित्र) निमित्त येथील कवायत मैदानावरील मुख्य इदगाहसह एकूण १८ ठिकाणी सामुदायिक नमाजपठण करण्यात आले.
ईदनिमित्त शहरातील कालीकुट्टी, सोनापुरा कब्रस्तान, सेंट्रल इदगाह ग्राउण्ड, शिया कब्रस्तान, जुमा मशीद, हुसेनी मशीद, मन्सुरा महाविद्यालय, आयेशानगर कब्रस्तान, गोल्डननगर मिल्लत मदरसा, खलीलशेठ मळा, चिंचमळा, ब्राह्मणपाडा, इस्जतेमानगर, मुफ्ती-ए-आजम इदगाह, भिकन शहा दर्गा, कल्लु स्टेडियम, खानका मशीद आदी ठिकाणी सामूहिक नमाज अदा करण्यात आली.
मुख्य नमाजनंतर मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचा राष्टÑीय एकात्मता व शांतता समिती, महसूल विभाग व पोलीस दलाकडून अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, मनपा आयुक्त किशोर बोर्डे, तहसिलदार चंद्रजित राजपूत, पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, रत्नाकर नवले, केवळ हिरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
हिंदू बांधवांकडून मुस्लीम बांधवांना ईदच्या गळाभेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन झाले. नमाजसाठी जाणाºया व नमाजनंतर परतणाºया मुस्लीम बांधवांसाठी ठिकठिकाणी पाण्याची व सरबतची व्यवस्था हिंदू बांधवांनी केली होती. येथील मोसमपुलावर मुस्लीम बांधवांचे स्वागत करण्यात येत होते. ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता.
पोलीस कवायत मैदानावर धातुशोधक यंत्राच्या साहाय्याने तपासणी करण्यात येत होती. तसेच मनोऱ्यांवरून विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस उपअधीक्षक हगवणे, नवले यांनी बंदोबस्तावर विशेष लक्ष ठेवले होते. ईदच्या नमाजनंतर पर्यटनासाठी जाणाºया मुस्लीम बांधवांनी येथील नवीन व जुन्या बसस्थानकावर गर्दी केली होती. शहराच्या पूर्वभागात दिवसभर उत्साहाचे वातावरण दिसून आले.
चांदवड : शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रसिद्ध नानावली मशीद येथे चौक मशीद, तांबट मशीद, शाही जुम्मा मशीद येथे धार्मिक कार्यक्रम व नमाजपठाण कार्यक्रम संपन्न झाले तर मुस्लीम बांधवांनी शिवाजी चौकातून मिरवणुकीने सोमवार पेठ, आठवडे बाजार, विश्रामगृहमार्गे जाऊन पुरातन इदगाह पटांगणावर मौलाना आबीद ऊर रहेमान यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाजपठण केले. नाईकवाडापुरा नानावली मस्जीद येथे मौलाना हासीन अबू नसर अब्दुल करीम शेख, चांदवड येथील चौक मस्जिद शिवाजी चौक येथे मौलाना हाजी सुलतानखान रहेमान व शहादाब अफतारी यांनी नमाजपठाण केले. पाऊस पडावा म्हणून मुस्लीम बांधवांनी प्रार्थना केली. त्यानंतर इदगाह पटांगण येथे मोठा शामीयाना उभारून तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक संजय पाटील, उपनिरीक्षक विशाल सणस व विविध पक्षांच्या नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्यात. यावेळी मुन्नुभाई घासी, नगरसेवक अल्ताफ तांबोळी, अशपाक खान अन्वर शहा, रिजवान घासी, मौलाना अख्तरभाई, मकसूद घासी, जाहीद घासी, फिरोजभाई पठाण, परवेज पठाण, गुल्लुभाई घासी, जाकीर शहा व मुस्लीम बांधव उपस्थित होते.

Web Title: Eid wishes to Muslim brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.