पंचवटीत आठ कृत्रिम तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:15 AM2021-09-18T04:15:58+5:302021-09-18T04:15:58+5:30
पंचवटी मनपा प्रशासनाकडून नांदूर-मानूर, तपोवन, राज माता मंगल कार्यालय, गोरक्षनगर, आरटीओ ऑफिस पेठरोड, कोणार्कनगर, रामवाडी जॉगिंग ट्रॅक, स्व. प्रमोद ...
पंचवटी मनपा प्रशासनाकडून नांदूर-मानूर, तपोवन, राज माता मंगल कार्यालय, गोरक्षनगर, आरटीओ ऑफिस पेठरोड, कोणार्कनगर, रामवाडी जॉगिंग ट्रॅक, स्व. प्रमोद महाजन उद्यान, सरस्वतीनगर या आठ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार आहे. म्हसरूळ सीतासरोवर, नांदूर गोदावरी, आडगाव पाझर तलाव, तपोवन कपिला संगम, रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा नैसर्गिक तलाव आहे. गणेश विसर्जन स्वच्छतेसाठी व निर्माल्य संकलनासाठी २३० हून अधिक स्वच्छता कर्मचारी नेमण्यात येणार असून, १४ विसर्जन ठिकाण असल्याने प्रत्येक स्पॉटवर निर्माल्यासाठी दोन घंटागाड्या याप्रमाणे २८ वाहनांची व्यवस्था केली जाईल, तर प्रसादासाठी वेगळे प्रसाद पात्र निर्माल्य टाकण्यासाठी कलश ठेवले जाणार असून, भाविकांनी निर्माल्य नदीपात्रात न टाकता स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे द्यावे किंवा मनपा निर्माल्य कलशात टाकण्याचे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संजय दराडे यांनी केले आहे.
इन्फो बॉक्स
मिरवणूक काढल्यास कारवाई
मिरवणुकीला बंदी
देशभरात कोरोना संसर्ग असल्याने नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन शासनाने केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुका काढायला प्रशासनाने मनाई केली असून, गणेश विसर्जनाच्या दिवशी जे मंडळे डीजे साउंड वाद्य वाजवून नियम उल्लंघन करतील त्या मंडळावर फौजदारी कारवाई केली जाईल.
मधुकर गावीत, सहाय्यक पोलीस आयुक्त