देशमानेत पुन्हा आठ दिवसांचा जनता कर्फ्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:22 AM2021-05-05T04:22:43+5:302021-05-05T04:22:43+5:30
गावातील रुग्णसंख्या सद्यस्थितीत स्थिर आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनादेखील करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतच्या वतीने सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी नियमित ...
गावातील रुग्णसंख्या सद्यस्थितीत स्थिर आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनादेखील करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतच्या वतीने सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी नियमित सुरू आहे. सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले आहे. मुखेड आरोग्य केंद्राच्या वतीने गावात लसीकरणदेखील करण्यात आले आहे. तीन दिवसांचा यापूर्वी जनता कर्फ्यू पाळण्यात आला आहे. गावात शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा यांच्यावतीने वाडीवस्त्यावर सर्व्हे सुरू आहे.
दरम्यान, गावातील कोरोना रुग्णाची संख्या अधिक असल्याने व त्यात पुनश्च वाढ टाळण्यासाठी देशमाने बु.व खु. या दोन्ही गावांत दि.४ ते ११मे या कालावधीत आठ दिवसांचा पुन्हा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय आरोग्य समिती व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
बैठकीस उपसरपंच यशवंत जगताप, माजी सरपंच प्रभाकर जगताप, ग्रा. पं. सदस्य संजय खैरनार, बापू काळे, शरद गोरे, गणेश दुघड, तलाठी पांडुरंग बोडके आदींसह सर्व किराणा व्यावसायिक उपस्थित होते.