नामपूरला आठ दिवसाआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 10:34 PM2018-04-09T22:34:15+5:302018-04-09T22:34:15+5:30
नामपूर : मोसम नदीपात्रातून सतत होणारा वाळू उपसा अन् तपमानाच्या वाढलेल्या पाऱ्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट होऊन विहिरी आटल्याने शहराला तब्बल आठ ते नऊ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नामपूरकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा वणवण भटकण्याची वेळ महिलांवर येऊन ठेपली आहे.
एकेकाळचा सुजलाम सुफलाम मोसम पट्टा आज प्रचंड वाळू उपशामुळे रख्ख वाळवंटात रूपांतरित होताना दिसत असून, सुपीक जमीन पाण्याअभावी नापेर होत आहे. या प्रचंड वाळू उपशाचा परिणाम म्हणजे शेतमालक आता शेतमजूर झालेले दिसत आहेत. मोसम नदीपात्रातून होणारा बेसुमार अवैध वाळू उपसा शहरातील पाणीटंचाईचे प्रमुख कारण आहे. प्रशासन वाळूचोरी रोखण्यात अपयशी ठरल्याने पाणीटंचाईची धग दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने शहरात टँकर्सद्वारा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मोसम खोºयाची प्रमुख व्यापारी बाजारपेठ असल्याने शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची समस्याही दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा वितरणासाठी आजही १९७२च्या कालबाह्य अशा जुन्या पाणीपुरवठा योजनेचा आधार घ्यावा लागत आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा करणाºया बहुतांश विहिरी मोसम नदीपात्रालगत आहेत. परंतु महसूल व पोलीस प्रशासनाच्या मैत्रीमुळे रात्रीच्या वेळी येथील
नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. विशेषत: सार्वजनिक पाणीपुरवठा करणाºया विहिरीजवळ वाळूचा उपसा होत असल्याने नामपूरकरांना भीषण पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.मोसम नदीपात्रातून वाळू उपसण्याचा परिणामनामपूर शहर हे नवीन तालुका निर्मितीत वेटिंग लिस्टला अग्रक्र मातील गाव. येथे पाणीप्रश्नातील तीव्रतेत वाळू उपसा हे मुख्य कारण आहे. द्यानेकरांनी आंदोलन केले तेव्हापासून वाळू उपसून ट्रॅक्टरने वाहतूक करणे काही प्रमाणात कमी झाले असले, तरी आता यासाठी गाढवांचा वापर सुरू आहे. अजूनही प्रचंड प्रमाणात वाळू उपसा होऊन शेकडोंच्या संख्येने असलेल्या या गाढवांद्वारे या वाळूची वाहतूक केली जाते. भल्या पहाटेपासून सुरू होणारा हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. नदीपात्रात उघडे खडक व मोठाले खड्डे हे वाळू उपशाचे नदीपात्रातील पुरावे आहेत. गावातील बांधकामांसाठी वाळू लागते या कारणातून रात्री-अपरात्री ही वाळू बाहेरगावीही पाठविली जाते. वाळूच्या चोरट्या वाहतुकीमुळे सर्वत्र खडकांचे साम्राज्य पाहायला मिळते. वाळूचोरट्यांनी मोसम नदी अक्षरश: बकाल करून टाकली आहे. साक्री रस्त्यालगत असलेल्या पुलाखालची वाळूदेखील या चोरांच्या नजरेतून सुटलेली नाही. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर २०१६ मध्ये आमदार दीपिका चव्हाण यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांसोबत बैठक घेऊन हरणबारी धरणातून टँकर्सद्वारा शहराला पाणीपुरवठा केला होता. त्या धर्तीवर यंदाही हरणबारी धरणातून टँकर्सद्वारा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.