तीन टोळ्यांतील आठ गुंड तडीपार; नाशिकरोड, उपनगर, सिकडोतील गुन्हेगारांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 06:37 PM2020-06-23T18:37:32+5:302020-06-23T19:21:42+5:30
सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी, नागरिकांध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन त्यांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणण्यासाठी नाशिकरोड, उपनगर व सिडको पोलीस ठाण्याच्या हृद्दीत टोळीने संघटितपणे गुन्हे करणाऱ्या तीन टोळक्यांतील गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
नाशिक : शहर व जिल्हयात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी, नागरिकांध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन त्यांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणण्यासाठी नाशिकरोड, उपनगर व सिडको पोलीस ठाण्याच्या हृद्दीत टोळीने संघटितपणे गुन्हे करणाऱ्या तीन टोळक्यांतील गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाबा बब्बु शेख याचे टोळीतील अक्षय बाळु धुमाळ(२३, रा. आरींगळे मळा, मोसिन युसुफ पठाण, (२६, रा. सादीक नगर, वडाळागाव) शुभम ज्ञानेश्वर सुर्यवंशी (२०, रा. देवळालीगाव, राजवाडा) यांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयभवानीरोड फर्नाडिसवाडीतील मयुर चमन बेद (३१) याच्यासह त्याच्या टोळीतील संजय उर्फ मॉडेल चमन बेद (३३) रोहित उर्फ माथ्या उर्फ बंटी, गोविंद महाले उर्फ डिंगम (२३) यांचाही तडीपारांमध्ये समावेश असून अंबड पोलीस स्टेशन हद्दीत उपेंद्रनगर येथील मोबीन तन्वीर कादरी व त्याचा साईबाबा नगर येथील साथीदार गौरव उमेश पाटील यांच्याविरोधात परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश काढले आहेत.
नाशिक शहरात वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार यांचे पासून शहरातील जनतेचे जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण व्हावे तसेच आगामी सण, उत्सव शांततेत पार पडावेत या करीता अशा गुन्हेगारां विरुध्द हृदुदपारी तसेच स्थानबध्दतेची कारवाई पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून गुन्हेगारांसह त्यांचे समर्थक व त्यांना बेकायदेशिरपणे मदत करणारे सर्वच स्तरातील व्यक्तींनाही नैतिक व सामाजिक जबाबदारीचे भान देवून आपले वर्तनात सुधारणा करावी असा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे. नागरिकांनीही साध्या वेशातील पोलीस म्हणून निर्भिडपणे पोलीसांना माहिती/तक्रारी देवून आपले कर्तव्य पार पाडावे. तसेच हद्दपार इसम नाशिक शहर व नाशिक (ग्रामिण) जिल्हयात दिसून आल्यास पोलीसांना माहिती दयावी. जेणेकरुन अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना मदत होईल असेही पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी स्प्ष्ट के ले आहे.