‘नाशिक ग्राहकश्री’ पुरस्काराने आठ मान्यवरांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:00 AM2017-12-25T01:00:00+5:302017-12-25T01:01:42+5:30
नाशिक : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांच्या हितासाठी योगदान देणाºया जिल्ह्यातील आठ मान्यवरांना नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने ‘नाशिक ग्राहकश्री’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़ गंगापूर रोडवरील पंपिंगस्टेशन रोडवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ ग्राहक हक्कांची पायमल्ली करणाºया वीज कंपनी व इतरांविरोधात तक्रार करून लढा देणारे शहरातील विजय कदम, निशांत खिंवसरा, बाळासाहेब चुंबळे, सोनाली दगडे तर ग्रामीणमधील राहुल जाधव, जगन्नाथ नाठे, छगन माळोदे, जिल्हा परिषद सदस्या धनश्री आहेर यांचा अध्यक्ष सुहासिनी वाघमारे व सचिव विलास देवळे व नगरसेवक हिमगौरी आडके-अहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला़ यावेळी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचे सचिव विलास देवळे यांनी नागरिकांनी जास्तीत जास्त ग्राहक संरक्षण कायद्याचा उपयोग करून तक्रारी करण्याचे आवाहन केले़ तसेच पुढील पंधरवड्यात शेतकरी ग्राहकांंच्या तक्रारी गोळा केल्या जाणार असल्याचे सांगितले़