जनावरांचे आठशे किलो मांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:47 IST2019-01-13T23:15:43+5:302019-01-14T00:47:51+5:30
भसवस फाट्या जवळून नाशिककडे जात असताना स्कॉर्पिओ उलटल्याने यामध्ये बेकायदेशीर कत्तल केलेल्या जनावरांचे मांस असल्याचे गोरक्षक यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याला दिली. पकडलेल्या ८०० किलो या मांसाची किंमत ९६ हजार रुपये इतकी आहे. गाडीतील संशयित पळून गेले असून या प्रकरणी संशियतांविरूद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनावरांचे आठशे किलो मांस जप्त
लासलगांव : भसवस फाट्या जवळून नाशिककडे जात असताना स्कॉर्पिओ उलटल्याने यामध्ये बेकायदेशीर कत्तल केलेल्या जनावरांचे मांस असल्याचे गोरक्षक यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याला दिली. पकडलेल्या ८०० किलो या मांसाची किंमत ९६ हजार रुपये इतकी आहे. गाडीतील संशयित पळून गेले असून या प्रकरणी संशियतांविरूद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी (दि.१२) रात्री १० वाजेच्या दरम्यान महिंद्रा कंपनीची सिल्व्हर रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम.एच. ०४. बीएस ४१५९ ही भरगाव नाशिककडे जात असताना भरवस फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली असता उग्र वास येत असल्याचे लक्षात येताच यामधून मोठ्या प्रमाणात गोमांस असल्याचे गोरक्षकांच्या लक्षात आले, त्यांनी याबाबत तत्काळ लासलगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधून याची माहिती लासलगांव पोलिसांनी दिली.
संशयितावर गोवंश हत्या कायदा महाराष्ट्र सुधारणा विधेयकानुसार लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. जे. शिंदे करित आहेत.