बॉश कंपनीतून आठ लाखांचा माल गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:13+5:302021-06-16T04:20:13+5:30
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतून कंपनीत काम करणारे काही संशयित कामगार, चहा, नाश्ता पुरवणारे कर्मचारी, ...
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतून कंपनीत काम करणारे काही संशयित कामगार, चहा, नाश्ता पुरवणारे कर्मचारी, कॅन्टीनमधील संशयित कामगार व कचरा घेऊन जाणाऱ्या संशयितांनी सप्टेंबर २०२० ते १२ जून २०२१ दरम्यान बॉश कंपनीतील बिल्डिंग क्रमांक १०१ ते १०५ मधील साहित्य चोरून नेले. त्यामध्ये ४ लाख ५७ हजार १३२ रुपये किमतीचे सीकेडी वॉलसेट,एक लाख १० हजार रुपये किमतीचे नोझल, एक लाख १३ हजार ७५० रुपये किमतीचे पिस्टन आणि १ लाख ५७ हजार ५०० रुपये किमतीच्या वॉलपीसचा आदी मालाचा समावेश आहे. संशयितांनी संगनमत करून कचऱ्यात ठेवून या साहित्याची चोरी केली आहे. काम करणाऱ्या कामगारांना चहा, नाश्ता पुरविण्यात येणाऱ्या कंत्राटी कामगारांनी चहाच्या ट्रॉलीमध्ये दररोज थोडा थोडा माल चोरून एका कामगाराच्या कपाटात ठेवत असे. सदर कामगार घनकचरा बाहेर नेणाऱ्या ॲपे रिक्षा चालकाच्या संगनमताने थोडा थोडा मुद्देमाल ॲपे रिक्षातून चोरुन बाहेर नेला. अशी फिर्याद कंपनीतील वरिष्ठ अधिकारी श्रीकांत ज्ञानेश्वर चव्हाण (रा. गंगापूररोड) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.