आठ महिन्यांत ५६ महिला विकृत वासनेच्या शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:20 AM2021-09-17T04:20:04+5:302021-09-17T04:20:04+5:30
---इन्फो-- गतवर्षीच्या तुलनेत वाढ गेल्या वर्षी शहर व परिसरात ४४ बलात्कार, १४६ विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या. या वर्षी आठ ...
---इन्फो--
गतवर्षीच्या तुलनेत वाढ
गेल्या वर्षी शहर व परिसरात ४४ बलात्कार, १४६ विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या. या वर्षी आठ महिन्यांत ६२ विनयभंग तर ५६ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यावरून बलात्काराचा आकडा या वर्षी अधिकच वाढल्याचे दिसते. अद्याप वर्ष सरण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून या तीन महिन्यांत हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून शहर व परिसरात महिलांची सुरक्षितता चव्हाट्यावर आल्याचे दिसते.
--इन्फो--
१०० टक्के गुन्ह्यांची उकल
महिलांविषयक गुन्ह्यांच्या उकलचे प्रमाण शहर पोलिसांचे चांगले आहे; मात्र गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न काही प्रमाणात कमी पडताना दिसत आहेत. मागील वर्षीदेखील बलात्काराच्या गुन्ह्यांचे उकलचे प्रमाण जवळपास ९६ टक्के इतके होते तर या वर्षी आतापर्यंत घडलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यांच्या तपासावरून सर्वच गुन्हे डिटेक्ट झाले असून उकलचे प्रमाण १०० टक्के असल्याचे दिसते. तसेच विनयभंगाच्या गुन्ह्यांचीही उकल ९७ टक्के इतकी आहे.
--इन्फो--
अल्पवयीन मुलीही बळी
शहर व परिसरात घडलेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये अनेकदा अल्पवयीन मुलीही बळी ठरतात. तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षणाचा कायदा जरी अस्तित्वात आला असला तरी त्यांचे लैंगिक शोषण थांबलेले नाही. विनयभंगाच्या घटनांसह लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अनेकदा अल्पवयीन पीडितांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
--आकडेवारी---
वर्ष
२०२०-विनयभंग- १४६/ बलात्कार- ४४
२०२१- विनयभंग- ६२/ बलात्कार ५६
---
२०१८--- अपहरण- १८२
२०१९--- अपहरण- १९९
२०२०-- अपहरण- १६३
२०२१- अपहरण- ८२
160921\16nsk_38_16092021_13.jpg~160921\16nsk_39_16092021_13.jpg~160921\16nsk_40_16092021_13.jpg
महिला अत्याचार थांबता थांबेना~महिला अत्याचार थांबता थांबेना~महिला अत्याचार थांबता थांबेना