मालेगावच्या मच्छिबाजारातील आठ अतिक्रमीत गाळे जमिनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 05:50 PM2020-02-20T17:50:03+5:302020-02-20T17:51:00+5:30
मालेगाव : शहरातील मच्छिबाजारातील सिटी सर्व्हे क्रमांक १३९७ वर उभारण्यात आलेले आठ अतिक्रमीत व्यापारी गाळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागान आज गुरूवारी जमिनदोस्त केले.
मालेगाव : शहरातील मच्छिबाजारातील सिटी सर्व्हे क्रमांक १३९७ वर उभारण्यात आलेले आठ अतिक्रमीत व्यापारी गाळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागान आज गुरूवारी जमिनदोस्त केले.
गेल्या मंगळवारी मनपाच्या महासभेत सत्ताधारी काँग्रेसने राजकीय दबावाला बळी पडून महापालिका प्रशासन शहरातील मच्छिबाजारातील अतिक्रमण हटविण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसने प्रशासनाला धारेवर धरत प्रशासनाच्या निषेधार्थ महासभा तहकूब केली होती. तसेच मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी आयुक्त बोर्डे, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी गुरूवारी अतिक्रमण काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज (दि. २०) रोजी मच्छिबाजारातील सकाळी साडेअकरा ते दोन वाजेदरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.