एकाच कुटुंबातील आठ जणांना अन्नातून विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 06:10 PM2020-01-03T18:10:50+5:302020-01-03T18:11:29+5:30
भालूर येथील घटना : कांदापात,भाकरीचे केले होते जेवण
नाशिक : जिल्ह्यातील भालुर ता. नांदगाव येथील एकाच कुटुंबातील आठ जणांना अन्नातून विषबाधा झाली असून त्यांना उपचारासाठी मनमाड उपजिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भालुर गावाच्या पूर्व शिवारात शेतमजुरी करणारे अशोक पांडुरंग मोरे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. शुक्रवारी (दि.३) या कुटुंबातील सदस्यांनी कांद्याची पात , शेपूची भाजी व भाकरी असे जेवण केले होते. जेवण झाल्यानंतर काही वेळाने त्यांना मळमळ व उलट्यांचा त्रास जाणवू लागला. याबाबतची माहिती या भागात राहणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष परशराम शिंदे यांना कळल्यानंतर त्यांनी मोरे कुटुंबाला तात्काळ उपचारासाठी मनमाड येथील उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले. मोरे कुटुंबातील अशोक मोरे, सिंधुबाई मोरे, पूजा मोरे, सविता मोरे, माधुरी मोरे, पल्लवी मोरे, वैष्णवी मोरे, रोहित बर्डे या आठ जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे उपजिल्हा रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पोद्दार यांनी सांगितले.