वन वणवे रोखण्यासाठी जिल्ह्यात आठ ‘टास्क फोर्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:14 AM2021-03-22T04:14:18+5:302021-03-22T04:14:18+5:30
चालू वर्षाची सुरुवात सिन्नर वनपरिक्षेत्रातील नांदुरा शिंगोटेसह नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत विविध राखीव वनांमध्ये आगीचा भडका उडाला आहे. चुंचाळे, ...
चालू वर्षाची सुरुवात सिन्नर वनपरिक्षेत्रातील नांदुरा शिंगोटेसह नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत विविध राखीव वनांमध्ये आगीचा भडका उडाला आहे. चुंचाळे, रोहिले, पहिने, धुमोडी, त्र्यंबकेश्वर, गिरणारेजवळील साप्ते, कोणे या शिवारातील वनांमध्ये कृत्रिम वणवे भडकल्याने वनसंपदेसह लागवड केलेली हजारो रोपेही जळाली आहेत. एप्रिल व मे महिन्यात पश्चिम वनविभागात कोठेही वणवा भडकणार नाही, यासाठी उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी कृती आराखडा तयार केला आहे.
आठ वनपरिक्षेत्रांतर्गत त्यांनी त्या वनपरिक्षेत्रातूनच पाच कर्मचाऱ्यांनी निवड करत ‘वणवा प्रतिबंधक टास्क फोर्स’ तयार केली आहे. टास्क फोर्सचे कर्मचारी वणव्याचा ‘कॉल’ येताच तत्काळ घटनास्थळी रवाना होईल. आजुबाजुच्या गावकऱ्यांची मदत घेत तत्काळ आग विझविण्याचे कार्य हाती घेईल. तोपर्यंत दक्षता पथक, जवळील दुसऱ्या वनपरिक्षेत्राचे ‘टास्क फोर्स’देखील वणवा विझविणाऱ्या टास्कफोर्सच्या मदतीसाठी धाव घेतील, असे आदेश देण्यात आले आहेत, असे गर्ग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
--इन्फो--
आवश्यक साधनसामुग्री पुरविण्यावर भर
प्रत्येक वनपरिक्षेत्रातून पाच वनरक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यांना सहायक वनसंरक्षकांमार्फत कार्यशाळेतून वन वणवा विझविण्याकरिता साधनसामुग्रीचा वापराबाबत धडे दिले जात आहे. या टास्क फोर्सला आग विझविण्याचे फायर एअर ब्लोअर, फायर बॉल, तसेच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा सुट, हलके हेल्मेट, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांसह आवश्यक साधनेही पुरविण्यावर भर पश्चिम वनविभागाकडून दिला जात आहे.
--इन्फो--
वणवा प्रतिबंधक कार्यशाळा
ननाशी, बारे, पेठ यांसारख्या वनपरिक्षेत्रांत वणवा प्रतिबंधक कार्यशाळाही घेण्यात आल्या आहेत. सर्वच परिक्षेत्रांत अशा कार्यशाळा घेतल्या जाणार आहे. सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल दर्जाचे अधिकारी वनरक्षकांना याद्वारे धडे देणार आहेत. नाशिक, पेठ दक्षता मोबाईल पथकांनाही वणवा प्रतिबंधक मोहिमेसाठी सज्ज राहण्याचा ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. उंटवाडी येथील वनविश्रामगृहातील आपत्कालीन दुरध्वनी यंत्रणा २४ तास कार्यान्वित असल्याचा दावाही गर्ग यांनी केला आहे.
------
इम्पॅक्ट स्टोरीचा लोगो वापरावा
फोटो आर वर २१फॉरेस्ट१/२
--
===Photopath===
210321\21nsk_30_21032021_13.jpg~210321\21nsk_31_21032021_13.jpg
===Caption===
आग विझविण्याचे प्रात्याक्षिक करताना वन कर्मचारी. दुसऱ्या छायाचित्रात वणवा प्रतिबंधक टास्क फोर्सचे जवान~आग विझविण्याचे प्रात्याक्षिक करताना वन कर्मचारी. दुसऱ्या छायाचित्रात वणवा प्रतिबंधक टास्क फोर्सचे जवान