अवघ्या सेाळा दिवसात अठराशे कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:13 AM2021-04-19T04:13:42+5:302021-04-19T04:13:42+5:30
कोराेनामुळे शहरात बाधितांची संख्या वाढते आहे, तसे मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. १ एप्रिल पासूनचा आढावा घेतला तर सरासरी ...
कोराेनामुळे शहरात बाधितांची संख्या वाढते आहे, तसे मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. १ एप्रिल पासूनचा आढावा घेतला तर सरासरी तीस जणांचे बळी जात आहेत त्यात नाशिक शहरातील बळींची संख्या काही प्रमाणात कमी असली तरी नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातून तसेच धुळे, जळगाव, नगर, नंदूरबार तसेच पालघरसारख्या ठिकाणहून रूग्ण येतात. येथील आरोग्य सुविधा तेथील सुविधांच्या तुलनेत जास्त असल्याने दीडशे- दोनशे किलोमीटर लांब जाऊनही आपल्या कुटूंबातील व्यक्ती वाचला पाहिजे या अपेक्षेने ते येतात आणि रूग्णाचा मृत्यू झाला तर संसर्ग वाढू नये यासाठी नाशिकमध्येच अंत्यसंस्कार करतात. नाशिकमधून पुणे किंवा मुंबईला उपचारासाठी नेलेल्या रूग्णाचा तेथे मृत्यू झाला तरी त्या व्यक्तीला देखील नाशिकमध्येच आणून अंत्यसंस्कार केलेे जातात. त्यामुळे नाशिक शहरातील चारही अमरधामचे बेड फुल असतात. सहाजिकच वेटिंग सुध्दा कायम असते.
नाशिक महापालिकेच्या पाच विभागातील अमरधामचा विचार केला तर १ ते १६ एप्रिल या कालावधीत २ हजार ३६० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यात १ हजार ७९३ कोरोना बाधीत तर ५६७ अन्य आजाराने मृत्यू पावलेल्यांचा समावेश आहे.
इन्फो..
नाशिक शहरातील चारही अमरधाममध्ये १६ दिवसात करण्यात आलेले अंत्यसंस्कार
(ग्राफसाठी)
नाशिक पूर्व
कोरोना बाधितांचे मृत्यू- ५४५
अन्य आजाराने मृत्यू- १०८
--
पंचवटी विभाग
काेरोना बाधितांचे मृत्यू- ४९४
अन्य आजाराने मृत्यू- १८६
--
नाशिकरोड विभाग
कोरोना बाधितांचे मृत्यू- ३९०
सामान्य आजाराने मृत्यू- ४४
----
सिडको विभाग
केारोना बाधितांचे मृत्यू- ३१२
---
सातपूर विभाग
कोरोना बाधितांचे मृत्यू- ५२
अन्य आजाराने मृत्यू- ५१
...कोट...
नाशिक शहराबरोबरच अन्य ग्रामीण भागातील मृतदेह देखील नाशिकमध्ये अंत्यसंस्कारासाठी येतात. ग्रामीण भागात स्मशानभूमी असूनही तेथे विद्युत किंवा गॅस दाहीनी नसल्याने अनेक गावातून मृतदेह नाशिकमध्ये अंत्यसंस्कारासाठी आणले जात आहेत. त्यामुळे नाशिक आणि पंचवटी अमरधामवर प्रचंड ताण येत आहे.
- डॉ. कल्पना कुटे, संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग
अन्य आजाराने मृत्यू- १७८