शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:40 AM2021-02-20T04:40:36+5:302021-02-20T04:40:36+5:30

नाशिक : शहर व परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त चौकाचौकात महाराजांच्या प्रतिमा आणि ...

The eighth form of Shivaraya. The eighth glory of Shivaraya. | शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।

शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।

googlenewsNext

नाशिक : शहर व परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त चौकाचौकात महाराजांच्या प्रतिमा आणि पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. भगवे ध्वज, पताकांनी अवघे शहर भगवेमय झाले होते. छत्रपतींच्या पराक्रमावर आधारित पोवाडे आणि गीतांनी वातावरण भारावून गेले होते. शिवजयंतीनिमित्ताने शहरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र स्कूल

नाशिक रोड : उपनगर येथील भा. वि. जोशी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शिवजयंतीनिमित्त मुख्याध्यापक सुरेश घरटे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शिक्षक केशव ठोंबरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. सुनील सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. वृषाली जायभावे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तानाजी पाटोळे, मोनिका चौधरी, चंद्रकांत कुलकर्णी, वंदना ठाकूर, बिंदूबेन वाघेला, योगिता ठोंबरे, प्रेरणा साबळे, युवराज दंडगव्हाळ, भरत खेलुकर आदी उपस्थित होते. (फोटो : १९ महाराष्ट्र स्कूल)

भोसला मिलिटरी स्कूल

नाशिक : सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन संचलित भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्स येथे शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला. पोवाडा, लेझीम पथक, ढोल-ताशांच्या गजरात व उत्साही वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला पालक मिलिंद वैद्य अध्यक्षा वसुधा कुलकर्णी, समादेशिका मेजर शैलजा रकिबे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापिकांनी आभार मानले. (फोटो:१९भोसला मिलिटरी स्कूल)

जिल्हाधिकारी कार्यालय

‍नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१वी जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन गावंडे, तहसीलदार दीपक पाटील, पल्लवी जगताप यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.‍ (फोटो:१९कलेक्टर ऑफीस)

विभागीय आयुक्त कार्यालय

नाशिक : विभागीय आयुक्त कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अपर आयुक्त भानुदास पालवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपायुक्त (महसूल) गोरक्ष गाडीलकर, उपायुक्त अर्जुन चिखले, तहसीलदार योगेश शिंदे आदी अधिकारी व कर्मचारी यांनीही प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (फोटो:१९डिव्हीजल कमिशनर)

रमाबाई आंबेडकर विद्यालय

नाशिक : मातोश्री रमाबाई आंबेडकर मुलींच्या वसतिगृहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव पी. के. गायकवाड होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुलींनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाला कैलास पाटील, माधवराव सावंत, सुधीर गायकवाड, अधीक्षक बेबीताई डेर्ले, सुरेखा पवार, रंजना देवरे, वैशाली नाठे, प्रकाश अहिरे उपस्थित होते. सूत्रसंचालन बेबी डेर्ले यांनी केले तर सुधीर गायकवाड यांनी आभार मानले. (१९रमाबाई आंबेडकर स्कूल)

एस. टी. महामंडळ

नाशिक : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एन. डी. पटेल रोडवरील विभागीय कार्यालयाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. विभाग नियंत्रक राजेंद्रकुमार पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी यंत्र अभियंता (चालन) मुकुंद कुंवर, वरिष्ठ सुरक्षारक्षक व दक्षता अधिकारी अजित भारती, वाहतूक नियंत्रक वृषाली भोसले आणि कैलास पाटील, उपयंत्र अभियंता प्रशात पदमने, मान्यताप्राप्त संघटनेचे प्रमोद भालेकर उपस्थित हाेते. महाराष्ट्र एस. टी. सेनेचे सुभाष जाधव यांनी सूत्रसंचालन केले. (१९एस.टी. महामंडळ)

एस. टी. टायर विभाग

नााशिक : एस. टी. महामंडळाच्या टायर नूतनीकरण सयंत्र येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपयंत्र अभियंता प्रशांत पदमने, चार्जमन प्रणव अहिरे, नीलेश कोतवाल, लिपिक अरुण शेळके, संयोजक राजेश गायकवाड, प्रकाश बारी, विलास सोनवणे, कैलास बोरसे, विशाल पाळंदे, योगेश कुलथे उपस्थित होते. (१९एस.टी. टायर डिपार्टमेंट)

आर. सी. एज्युकेशन

नाशिक : आर. सी. एज्युकेशन, नाशिक व दिव्यांग संघटना यांच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी संचालक रवींद्र पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, प्रहार संघटनेच्या राज्याध्यक्षा संध्या जाधव, सोमनाथ नागरे, प्रहार अपंग संघटनेचे शहराध्यक्ष ललित पवार, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बबलू मिर्झा, संकल्पसिद्धी बचत गटाच्या अध्यक्ष कुसुम बोरीचा तसेच दत्ताजी कांगणे, सुभाष निकाळजे, विनायक कस्तुरे, संजय पोरजे, गणेश प्रधान, रवी आहेर उपस्थित होते. (१९आरसी एज्युकेशन)

Web Title: The eighth form of Shivaraya. The eighth glory of Shivaraya.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.