भगूरला देवी मंदिरात आठव्या माळेला गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:15 AM2017-09-29T00:15:23+5:302017-09-29T00:16:07+5:30
भगूरच्या रेणुका माता मंदिरासह परिसरातील देवी मंदिरांमध्ये नवरात्रीच्या गुरुवारी आठव्या माळेला विधीवत पद्धतीने होम-हवन करण्यात आले. अष्टमीनिमित्त देवी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
देवळाली कॅम्प : भगूरच्या रेणुका माता मंदिरासह परिसरातील देवी मंदिरांमध्ये नवरात्रीच्या गुरुवारी आठव्या माळेला विधीवत पद्धतीने होम-हवन करण्यात आले. अष्टमीनिमित्त देवी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
भगूर येथील प्राचीन श्री रेणुका माता मंदिरात गुरुवारी पहाटे नवरात्रीच्या आठव्या माळेनिमित्त पुजारी चंद्रकांत चिंगरे व कुटुंबीयांच्या हस्ते होम-हवन करण्यात आले. तसेच लॅमरोड सहा नंबर नाका येथील जागृत देवस्थान माळावरची देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री महालक्ष्मी माता मंदिरात गजानन गोसावी यांसह ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चारात होम केला. होम-हवनच्या पूजेस प्रमोद आडके सपत्नीक बसले होते.
यावेळी भाविक व महिलांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. शीतला माता मंदिरात पाच जोडप्यांच्या हस्ते होम व पूजा-अभिषेक मुख्य पुजारी राहुल शिरसाठ यांनी सांगितले. गुरुद्वारा रोडवरील महालक्ष्मी मंदिर, मरीमाता मित्रमंडळ, टांगा लाइन येथील दुर्गा माता मंदिर व श्री गणेश सोशल फाउंडेशन आदि सार्वजनिक मंडळाच्या मंडपात अष्टमीला होम करण्यात आला.