शिवरायांचे आठवावे रूप

By admin | Published: February 19, 2017 11:44 PM2017-02-19T23:44:49+5:302017-02-19T23:45:19+5:30

शिवजयंती : शहरात शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रम

The eighth look of Shivrajaya | शिवरायांचे आठवावे रूप

शिवरायांचे आठवावे रूप

Next

नाशिक : शहरातील विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच शहरातील काही शाळांमध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला विविध, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
मराठा हायस्कूल
मराठा हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पिंगळे होते. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक योगराज चव्हाण व पर्यवेक्षक अरुण पवार उपस्थित होते. समृद्धी मोगल या विद्यार्थिनीने शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. मुख्याध्यापक पिंगळे यांनीही शिवरायांच्या जीवनकार्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. याप्रसंगी विजय म्हस्के, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्मवीर हिरे विद्यालय
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित के. बी. एच. विद्यालय, पवननगर, सिडको येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक खेडकर, डी. के. खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कलाशिक्षक एस. एम. जगताप यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. एस. पी. पवार व निकम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषणे केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एम. जगताप होते. याप्रसंगी उपमुख्याध्यापक सोनवणे, पर्यवेक्षक बी. पी. कदम, काकळज, व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन वाय. एस. देशमुख यांनी केले.
मविप्रतर्फे शिवजयंती
नाशिक : छत्रपती शिवाजी स्मारक समिती व मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतापदादा सोनवणे होते. यावेळी छत्रपती शिवाजी स्मारक समितीच्या अध्यक्ष नीलिमा पवार, सभापती नितीन ठाकरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक नाना महाले, भाऊसाहेब खातळे, शिक्षणाधिकारी, सर्व प्राचार्य, शिक्षक, सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
मातोरी गाव
मातोरीगावात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी इच्छामणी मित्रमंडळ, पोलीसपाटील रमेश पिंगळे, रमण पिंगळे, रवि भोर, राजाराम पिंगळे, शिवाजी लोखंडे, भाऊसाहेब पिंगळे, प्रभाकर पिंगळे, समाधान वामने, सुनील चारोस्कर, जितेंद्र साठे, रवींद्र साठे आदिंनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
पंचवटी सार्वजनिक वाचनालय
पंचवटीतील इंद्रकुंड परिसरात सार्वजनिक वाचनालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. याप्रसंगी माधव भणगे अध्यक्षस्थानी होते. उत्तम देवरे प्रमुख पाहुणे होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. शांताराम रायते यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकला. सूत्रसंचालन हिरालाल परदेशी यांनी केले. नथू देवरे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी व मुक्तद्वार विभागातील वाचक उपस्थित होते.
 

Web Title: The eighth look of Shivrajaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.