एकलहरे प्रकल्प बचाव समितीचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:19 AM2020-12-30T04:19:16+5:302020-12-30T04:19:16+5:30
एकलहरे प्रकल्प बचाव समितीची सोमवारी बैठक झाली. यावेळी शासन एकलहरेचा प्रकल्प बंद करून सिन्नरचा रतन इंडिया वीज प्रकल्प सुरू ...
एकलहरे प्रकल्प बचाव समितीची सोमवारी बैठक झाली. यावेळी शासन एकलहरेचा प्रकल्प बंद करून सिन्नरचा रतन इंडिया वीज प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. सिन्नरच्या जनतेच्या विकासाला विरोध नाही, परंतु त्यासाठी एकलहरेवासीयांचा बळी जात असेल तर मुळीच खपवून न घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. एकलहरे प्रकल्प सुरू न झाल्यास त्यावर अवलंबून असलेल्या पंचक्रोशीतील २० हजारांच्या जवळपास नागरिक, रोजंदारी कामगार, ठेकेदारी कामगार, व्यावसायिकांचे हाल होणार आहेत. मात्र सध्या तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने एकलहरे येथील प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या वतीने १ जानेवारीला होणारे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष शंकरराव धनवटे यांनी सांगितले. आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले. बैठकीस कार्याध्यक्ष विनायक हारक, श्रीधर गायधनी, बळीराम कांबळे, सागर जाधव, चंद्रशेखर आहेर आदी उपस्थित होते.