सिटी लिंक बसच्या धडकेत वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 01:40 AM2022-04-11T01:40:59+5:302022-04-11T01:41:26+5:30

सिडको परिसरातील दुर्गा चौकातून रस्ता ओलांडणाऱ्या एका वयोवृद्धाला नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटी लिंक बसने (एम.एच१५ जीव्ही ७९६७) जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीररित्या जखमी झालेले निंबा उखा ह्याळीज (८५, रा. रायगड चौक) यांचा रविवारी (दि.१०) सकाळी जागीच मृत्यू झाला.

Elderly man killed in City Link bus crash | सिटी लिंक बसच्या धडकेत वृद्ध ठार

सिटी लिंक बसच्या धडकेत वृद्ध ठार

Next
ठळक मुद्देदोघे सुदैवाने बचावले : रस्ता ओलांडताना घडली दुर्घटना

सिडको : परिसरातील दुर्गा चौकातून रस्ता ओलांडणाऱ्या एका वयोवृद्धाला नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटी लिंक बसने (एम.एच१५ जीव्ही ७९६७) जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीररित्या जखमी झालेले निंबा उखा ह्याळीज (८५, रा. रायगड चौक) यांचा रविवारी (दि.१०) सकाळी जागीच मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पवन नगरकडून बस भरधाव वेगाने जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने जात होती. यावेळी दिव्या अॅडलबच्या वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने मॉर्निंग वॉक करून घरी परतणारे ह्याळीज यांचा बसखाली चिरडून मृत्यू झाला. ह्याळीज हे येथून रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना बसचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत हायगयीने व अविचाराने त्याच्या ताब्यातील वाहन दामटवित वृद्ध ह्याळीज यांना धडक दिली. यावेळी ते बसच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्याने त्यांच्या पोटावरून चाक गेले. यामुळे ते गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. यावेळी अन्य दोघे तरुण यावेळी बालंबाल बचावले. तेदेखील येथून याच वेळी रस्ता ओलांडत होते. अपघात घडताच तातडीने अंबड पोलिसांना घटनेची माहिती नागरिकांनी कळविली. काही वेळेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच सिटी लिंक बस सेवेचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांनी ह्याळीज यांच्या मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. यानंतर अंबड पोलीस ठाण्यात अपघातग्रस्त बस जमा करण्यात आली. याप्रकरणी संंबंधित बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Elderly man killed in City Link bus crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.