दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:25+5:302021-04-04T04:15:25+5:30
------ ओटीपी घेऊन फसवणूक नाशिकरोड : येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते योगेश भगत यांना एसबीआय बॅंकेतून मी बोलत असून तुमच्या ...
------
ओटीपी घेऊन फसवणूक
नाशिकरोड : येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते योगेश भगत यांना एसबीआय बॅंकेतून मी बोलत असून तुमच्या खात्याचा केवायसी जुळत नाही असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर घेऊन खात्यातून परस्पर वीस हजार रुपये घेऊन फसवणूक केली.
योगेश फलराज भगत यांना २४ मार्चला कृष्णमूर्ती नावाने एकाने फोन केला. मी एसबीआय बॅंकेतून बोलत असून तुमच्या खात्याचा केवायसी पूर्ण झाला आहे. मी तुम्हाला ओटीपी नंबर पाठवतो. तो आल्यावर मला सांगा असे सांगून त्याने फोन ठेवला. थोडा वेळ्याने त्या व्यक्तीने फोन करुन भगत यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी घेऊन त्यांच्या खात्यातून परस्पर वीस हजार रुपये काढून फसवणूक केली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.