तिन वाहनांच्या अपघातात वृद्ध महीलेचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 18:59 IST2020-12-26T18:57:47+5:302020-12-26T18:59:18+5:30
वणी : नाशिक कळवण रस्त्यावरुन पिंपळनारे शिवारातील खतवड फाटा परिसरात तिन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात 80 वर्षीय वृद्ध महीलेचा अंत झाला असुन पती पत्नी जखमी झाले आहेत.

तिन वाहनांच्या अपघातात वृद्ध महीलेचा मृत्यु
वणी : नाशिक कळवण रस्त्यावरुन पिंपळनारे शिवारातील खतवड फाटा परिसरात तिन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात 80 वर्षीय वृद्ध महीलेचा अंत झाला असुन पती पत्नी जखमी झाले आहेत.
याबाबत माहीती अशी दिंडोरी पोलीसांच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या खतवड फाटा परिसरात दिंडोरी नाशिक रस्त्यावर भरधाव वेगातील क्रेटा कार मार्गक्रमण करत समोरुनअसताना दुसरी कार आली व इंडीकेटर देत खतवड फाट्यावरुन वळण घेत असताना क्रेटा कारने आय ट्वेंटी या कारला जबर धडक दिली .तसेच आय ट्वेंटी कारच्या मागे असलेल्या पिकअपला हि अनियंत्रित कार जाऊन धडकली या अपघातात आय ट्वेंटी कार
मधील यशोदाबाई बाबुराव बोडके यांचा दुर्दैवी मृत्यु झाला तर लंकाबाई गोरक्षनाथ बोडके व गोरक्षनाथ बाबुराव बोडके हे जखमी झाले असुन त्यांचेवर उपचार सुरु आहेत .दिंडोरी पोलीस अधिक तपास करत आहेत.