बागलाण तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 04:32 PM2019-11-16T16:32:25+5:302019-11-16T16:38:54+5:30
पहिला दिवस निरंक : प्रथमच होणार थेट सरपंचपदाची निवड
सटाणा : तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींची मुदत येत्या २९ डिसेंबरला संपत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्र म जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रि या सुरु झाली असून शनिवारपासून (दि.१६) थेट सरपंचपदासह सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. मात्र पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
बागलाण तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींची येत्या १४ ते २९ डिसेंबर दरम्यान मुदत संपत आहे. मुदतीत निवडणुका घेण्याच्या दृष्टीने आयोगाने निवडणूक कार्यक्र म घोषित केला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी स्पष्ट केले. १९ ग्रामपंचायतींमध्ये किकवारी खुर्द,अजमिर सौंदाणे, नवे निरपूर,जुने निरपूर ,भडाणे, ब्राम्हणपाडे, बिजोरसे, काकडगाव, पारनेर, जोरण, फोपीर, क-हे, साल्हेर, चापापाडा- देवपूर, सुराणे, नवेगाव, पठावे दिगर-सावरगाव, नांदीन व आखतवाडे या गावांचा समावेश असून प्रथमच येथे थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शनिवारपासून (दि.१६ ) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून गुरु वार (दि.२१) पर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत त्याची मुदत राहणार आहे . २२ नोव्हेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होऊन त्यानंतर २५ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे . ८ डिसेंबरला मतदान प्रक्रि या होऊन दुसऱ्या दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.