इगतपुरी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 02:28 PM2019-02-21T14:28:30+5:302019-02-21T14:28:48+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ५ मार्चपासून उमेदवारांना आॅनलाईन नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. निवडणुकीची मतमोजणी २५ मार्चला होणार आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सक्रि य झाली असून इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली आहे.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ५ मार्चपासून उमेदवारांना आॅनलाईन नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. निवडणुकीची मतमोजणी २५ मार्चला होणार आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सक्रि य झाली असून इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली आहे. इगतपुरी तालुक्यातील वाकी, मुरंबी, देवळे, इंदोरे, रायांबे, उभाडे, मालुंजे, धामणी, म्हसुर्ली, आहुर्ली, धार्णोली, सोनोशी, समनेरे, बोरटेंभे, कावनई, खैरगाव, खडकेद, नांदूरवैद्य, अधरवड, शेवगेडांग, बारशिंगवे, कोरपगाव, मांजरगाव, कांचनगाव, बेलगाव कुर्हे, शेणवड बुद्रुक, पिंपळगाव मोर, पाडळी देशमुख, मायदरा धानोशी, पिंपळगाव भटाटा या ३० ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित करण्यात आली आहे. उद्या २२ फेब्रुवारीला निवडणुकीच्या नोटीसीची प्रसिद्धी करण्यात येईल. आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी ५ मार्च ते ११ मार्चमुदत देण्यात आली असून दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ११ मार्चला ११ वाजेपासून करण्यात येणार आहे. माघारीसाठी १३ मार्चला दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर उमेदवारांना चिन्हवाटप आणि अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्धी १३ मार्चला दुपारी ३ वाजेनंतर होणार आहे. ३० ग्रामपंचायतींसाठी २४ मार्चला सकाळी ७. ३० ते
५. ३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी २५ मार्चला करण्याचे घोषित झाले आहे. दरम्यान ३० ग्रामपंचायतीमध्ये तुल्यबळ लढती होणार असून यंदा प्रथमच थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने चुरस पाहायला मिळेल. इच्छुकांची धावपळ उडाली असून आरक्षण बदलले असल्याने कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे. निवडणुक यंत्रणा सक्र ीयतेने नियोजन करीत आहे.
----------------------
३० गावांसाठी निवडणूक घेण्यासाठी आयोगाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. निवडणुकीशी संबंधितांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. निष्पक्ष निर्भीड वातावरणात निवडणुका घेण्यासाठी आम्ही सिक्र य आहोत.
- वंदना खरमाळे, तहसीलदार इगतपुरी