जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:32 AM2020-12-12T04:32:06+5:302020-12-12T04:32:06+5:30

३१ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून ४ जानेवारीला अर्ज माघारी घेता येणार आहे. याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर ...

Election of 621 Gram Panchayats in the district announced | जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

Next

३१ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून ४ जानेवारीला अर्ज माघारी घेता येणार आहे. याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्हे वाटप केली जाणार आहेत. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. १८ रोजी मतमोजणी केली जाईल असा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने यापूर्वीच ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून निवडणुकीच्या हालचाली तेव्हापासून गतिमान झाल्या होत्या. आता निवडणुकीची औपचारिक घोषणा झाली आहे. यापूर्वी स्थगित १०२ आणि डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ५१९ अशा एकूण ६२१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

--इन्फो--

यापूर्वी एप्रिल ते जुलै या कालावधीत जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतीची मुदत संपुष्टात आली होती. या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली मात्र कोविडमुळे पुढील प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. आता या निवडणुकीची प्रक्रिया पुढे राबविली जाणार आहे.

==इन्फो--

मुदत संपलेल्या ग्रामपंचायती

तालुका ग्रामपंचायतींची संख्या

नाशिक २५

त्र्यंबक ०३

दिंडोरी ६०

इगतपुरी ०८

निफाड ६५

सिन्नर १००

येवला ६९

मालेगाव ९९

नांदगाव ५९

चांदवड ५३

कळवण २९

बागलाण ४०

देवळा ११

एकूण ६२१

Web Title: Election of 621 Gram Panchayats in the district announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.