निवडणूक : भाजपाचे वर्चस्व
By admin | Published: July 13, 2017 12:07 AM2017-07-13T00:07:45+5:302017-07-13T00:37:23+5:30
२४ जुलैला विषय समित्या सभापती; निवडणूक कार्यक्रम जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सदस्यांच्या नियुक्त्या होऊन तब्बल दोन महिने उलटल्यानंतर महापालिकेच्या विधी, आरोग्य-वैद्यकीय आणि शहर सुधार या तीन विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी घोषित केला आहे. सोमवार, दि. २४ जुलै रोजी निवडणूक घेण्यात येणार असून, अपर आयुक्त जोतिबा पाटील यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, तीनही समित्यांवर भाजपाचेच वर्चस्व असल्याने भाजपाचेच सभापती विराजमान होणार आहेत.
महापालिकेत नव्याने तीन विषय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. दि. २६ मे रोजी झालेल्या महासभेत महापौर रंजना भानसी यांनी समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या घोषित केल्या होत्या. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर सभापती-उपसभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम लागला आहे. वैद्यकीय व आरोग्य समितीवर भाजपाचे सतीश कुलकर्णी, अंबादास पगारे, रुपाली निकुळे, शांता हिरे, छाया देवांग, शिवसेनेच्या किरण गामणे, हर्षदा गायकर, रंजना बोराडे आणि मनसेचे योगेश शेवरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
शहर सुधार समितीवर भाजपाचे स्वाती भामरे, पंडित आवारे, रुची कुंभारकर, भगवान दोंदे, सुदाम नागरे, शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले आणि मनसेच्या सुरेखा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे मनसेला बक्षिसी शक्यतीनही समित्यांवर बहुमत असल्याने भाजपाचेच उमेदवार सभापती-उपसभापतिपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सातपूर प्रभाग निवडीप्रसंगी मनसेने भाजपाला साथ दिल्याने एखाद्या समितीचे सभापती अथवा उपसभापतिपद मनसेच्या पारड्यात टाकले जाण्याची शक्यता आहे.