निफाड तालुक्यात सहकारी संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 08:34 PM2021-11-28T20:34:59+5:302021-11-28T20:34:59+5:30
निफाड : तालुक्यातील १३ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली असून या संस्थांसाठी १९ डिसेंबर रोजी मतदान व त्याच दिवशी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने निफाडचे सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक रणजीत पाटील यांनी दिली आहे.
निफाड : तालुक्यातील १३ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली असून या संस्थांसाठी १९ डिसेंबर रोजी मतदान व त्याच दिवशी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने निफाडचे सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक रणजीत पाटील यांनी दिली आहे.
या सर्व १३ संस्थांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरणे, नामनिर्देशन पत्राची छाननी करणे या प्रक्रिया पूर्ण झाल्या असून पात्र व प्राप्त नामनिर्देशन पत्र ज्या उमेदवारास मागे घ्यावयाचे आहे. त्यांना ८ डिसेंबरपर्यंत मुदत असून ९ डिसेंबर रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर निवडणूक १९ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येऊन मतदानाची मुदत संपल्यानंतर लगेचच अर्ध्या तासानंतर मतमोजणी घेऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
निफाड तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांची नावे व त्यासाठी निवडणूक प्राधिकरणाने नेमणूक केलेले निवडणूक निर्णय अधिकारी पुढीलप्रमाणे गोंदेगाव सहकारी सेवा संस्था मर्या. गोंदेगाव (रणजीत पाटील-सहा. निबंधक), रेणुका माता सेवा संस्था मर्या. निमगाव (जगदीश पाटील- सहकार अधिकारी), गुंजाळवाडी सहकारी सेवा संस्था मर्या. गुंजाळवाडी (बाळासाहेब थेटे-सहकार अधिकारी), चितेगाव सहकारी सेवा संस्था मर्या. चितेगाव (अशोक काकड-मुख्य लिपिक), बाणेश्वर सहकारी सेवा संस्था मर्या. कोठुरे (कैलास पिठे-सहाय्यक सहकार अधिकारी), बाणगंगा सहकारी सेवा संस्था बाणगंगानगर (रवींद्र गुंजाळ-लेखा परीक्षक), विवेकानंद सहकारी सेवा संस्था मर्या. चापडगाव (ज्योती घडोजे-लेखा परीक्षक), वर्हेदारणा सेवा संस्था मर्या. वर्हेदारणा (मुरलीधर भोये- लेखा परीक्षक ), समर्थ सेवा संस्था मर्या. शिवरे (सचिन खैरनार-सहकार अधिकारी), नारायणटेंभी सहकारी संस्था मर्या, नारायणटेंभी (सचिन काकड -वरिष्ठ लिपिक), शिवरे सहकारी सेवा संस्था मर्या. शिवरे ( कृष्णा वाळके-वरिष्ठ लिपिक), भैरवनाथ सहकारी सेवा संस्था मर्या. चाटोरी (सुनील आढाव-अप्पर लेखा परीक्षक), निफाड तालुका ग्रामोद्योग संघ (आर. एस. ढवळे-सहकार अधिकारी)