कीर्तांगळी विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध

By admin | Published: February 21, 2016 10:02 PM2016-02-21T22:02:34+5:302016-02-21T22:26:52+5:30

कीर्तांगळी विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध

The election of Kirtangali Vikas Sanstha is unconstitutional | कीर्तांगळी विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध

कीर्तांगळी विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध

Next


वडांगळी : सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी विकास संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे बिनविरोध पार पडली. संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी २६ जणांनी अर्ज दाखल केले होते. ज्येष्ठ नेत्यांनी मनधरणी केल्याने १३ जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने उर्वरित १३ जणांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सर्वसाधारण प्रवर्गाच्या आठ जागांसाठी १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी भाऊसाहेब चव्हाणके, दत्तू चव्हाणके, सुदाम चव्हाणके, अरुण चव्हाणके, ज्ञानेश्वर शिवाजी चव्हाणके, शशिकांत चव्हाणके, ज्ञानेश्वर सूर्यभान चव्हाणके, गोरक्षनाथ चव्हाणके, मच्छिंद्र चव्हाणके यांनी माघार घेतली. त्यामुळे साहेबराव चव्हाणके, सुकदेव घुले, बाबूराव कांडेकर, दशरथ चव्हाणके, विठ्ठल चव्हाणके, भास्कर चव्हाणके, विलास चव्हाणके, जालिंदर चव्हाणके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय गायकवाड यांनी काम पाहिले.
 

Web Title: The election of Kirtangali Vikas Sanstha is unconstitutional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.